पुणे (1 एप्रिल 2024) – युवा कबड्डी सिरीज मध्ये रेलीगेशन फेरीच्या सहाव्या दिवशी तिसरी लढत नांदेड विरुद्ध लातूर या संघांत झाली. दोन्ही संघांचे प्ले-ऑफ मधील आव्हान संपुष्टात आले होते त्यामुळे सामना औपचारिकता होती. दोन्ही संघानी सामन्याची सुरुवात सावध केली होती. 10 मिनिटांच्या खेळानंतर सामना 4-4 असा बरोबरीत सुरु होता. लातूर कडून अजिंक्य कटले व प्रदिप आकांगिरे चढाईत गुण मिळवले तर नांदेड कडून आर्यन धावले यांनी चढाईत गुण मिळवले.
मध्यंतरापर्यत सामना अत्यंत चुरशीचा झाला. लातुर संघाकडे मध्यंतराला 13-11 अशी नाममात्र 2 गुणांची आघाडी होती. मध्यंतरा नंतर अजिंक्य कटले ने झटापट गुण मिळवत नांदेड संघाला ऑल आऊट करत 19-11 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर ही अजिंक्य व प्रदिप दोघांनी उत्कृष्ट खेळ करत गुण मिळवत लातूर संघाची आघाडी वाढवली. आर्यन धावले ने चतुरस्त्र चढाया करत गुण मिळवत सामन्यात चुरस वाढवली होती.
लातूर संघाने संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट खेळ करत 35-30 असा जिंकला. लातूर संघाने सांघिक खेळ केला. लातूर कडून प्रदिप आकांगिरे ने चढाईत 6 तर पकडीत 2 गुण मिळवले. अजिंक्य कटले ने चढाईत 6 गुण मिळवले. रोहित पवार ने 5 उत्कृष्ट पकडी केल्या. तर सोहेल शेख ने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. नांदेड कडून आर्यन धावले ने चढाईत सर्वाधिक 13 गुण मिळवले. तर हर्ष आल्हाट व निसर पठाण ने पकडीत प्रत्येकी 3 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- आर्यन धावले, नांदेड
बेस्ट डिफेंडर- रोहित पवार, नांदेड
कबड्डी का कमाल – आर्यन धावले, नांदेड
महत्त्वाच्या बातम्या-
मराठीत माहिती – क्रिकेटर अजित वाडेकर
रेलीगेशन फेरीत नाशिक संघाची विजयाची हॅट्रिक
प्रमोशन फेरीत अहमदनगर संघाचा विजयाचा पचं