भारतीय संघ आणि एकंदरीत पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान दिलेला सचिन तेंडुलकर याने एक महत्वाचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर शनिवारी (24 सप्टेंबर) त्याचा 23 वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्जुनच्या वयात सचिन भारतीय संघाचा एक महत्वाचा खेळाडू बनला होता, पण अर्जुनला तशी कामगिरी करता येत नाहीये. अर्जुन अजूनही संघर्ष करत असला, तरी आता त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात होण्याची शक्यता तयार होत आहे. कारण आहेत युवराज सिंगचे वडील योगराज सिंग.
युवराज सिंग (Yuvraj Singh) याचे वडील योगराज सिंग (Yograj Singh) सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम खात्यावरून सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याचे काही फोटो शेअर केले आहेत. अर्जुन सध्या त्यांच्याच मार्गदर्शनात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभांगांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे.
https://www.instagram.com/p/Ci2U-JcJHri/?utm_source=ig_web_copy_link
अर्जुन आणि योगराज यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, अर्जुन तेंडुलकर योगराज यांच्या अनुभवाचा फायदा घेत मैदानात सराव करत आहे. डीएवी कॉलेज चेंडीगड याठिकाणच्या क्रिकेट अकादमीत अर्जुन घाम गाळत असल्याचे समोर आले आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर मोठे शॉट्स खेळण्यासाठीही ओखळला जातो. जर त्याला भविष्यात युवराज सिंगप्रमाणे षटकार मारायचे असतील तर योगराज यांचे मार्गदर्शन नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
https://www.instagram.com/p/Ciwit0Jv095/?utm_source=ig_web_copy_link
देशांतर्गत क्रिकेटमध्ये अर्जुन मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करत होता, पण त्याला अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत. अशात आता तो गोवा संघासोबत खेळत आहे. तो 27 व्या अखिल भारतीय जेपी अत्रे स्मृती क्रिकेट टूर्नामेंटमध्येही भाग घेणार आहे. ही स्पर्धा 22 सप्टेंबर रोजी चंदीगडमध्ये सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात 100 पेक्षा अधिक खेळाडू असे आहेत, ज्यांनी नंतर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. अशात ही स्पर्धा अर्जुनसाठी देखील महत्वाची ठरेल, अशी शक्यता नाकारता येणार नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एमएसएलटीए बी1आशियाई कुमार टेनिस स्पर्धेत एकेरीत मानस धामणे व श्रुती अहलावत यांना विजेतेपद
एमएस धोनीची पोस्ट व्हायरल! करणार मोठी घोषणा; नेमके कुठे, घ्या जाणून
विराटच्या एका इशाऱ्यावर नागपूर स्टेडियम ‘गप-गार’, चाहत्यांच्या ‘या’ कृत्यामुळे भडकला माजी कर्णधार