युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर अनेक वेळा टीका केली आहे. योगराज यांनी धोनीवर युवराजचं करिअर उद्ध्वस्त केल्याचाही आरोप केला होता. युवराज 2007 चा टी20 विश्वचषक आणि 2011 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. त्यानं 17 वर्षे भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. मात्र नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान योगराज सिंग यांनी चक्क महेंद्रसिंह धोनीचं कौतुक केलं आणि त्याला एक निर्भय माणूस म्हटलं.
योगराज सिंग सध्या तरुण क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनंही त्यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतलं आहे. युट्यूबर समदीशच्या ‘अनफिल्टर्ड’ या शोमध्ये बोलताना योगराज सिंग यांनी एमएस धोनीचं कौतुक केलं. धोनीला विकेट वाचता येते, असं ते म्हणाले. याआधी एका मुलाखतीदरम्यान त्यांनी असंही म्हटलं होतं की, ते त्यांच्या आयुष्यात एमएस धोनीला कधीही माफ करणार नाहीत.
योगराज सिंग म्हणाले, “मला वाटतं की धोनी हा खूप उत्साही कर्णधार आहे. तो लोकांना काय करायचं ते सांगू शकतो. धोनीची चांगली गोष्ट म्हणजे तो विकेट वाचू शकतो आणि गोलंदाजांना चेंडू कुठे टाकायचा हे सांगू शकतो.” योगराज सिंग पुढे बोलताना म्हणाले, “मला त्याच्याबद्दल सर्वात चांगली गोष्ट आवडली ती म्हणजे तो एक निर्भय माणूस होता. जर तुम्हाला आठवत असेल तर ऑस्ट्रेलियामध्ये मिचेल जॉन्सनचा एका चेंडू त्याच्या ग्रिलवर लागला होता. मात्र तो अजिबात हलला नाही. तो तिथेच उभा राहिला आणि पुढच्या चेंडूवर षटकार मारला. असे लोक खूप कमी आहेत.”
Yograj Singh on MS Dhoni 🤯👀🔥.
— Jason𝕏 (@mahixcavi7) January 12, 2025
योगराज सिंग यांच्या तोंडून धोनीबद्दल या गोष्टी ऐकल्यानंतर लोकांना त्यांच्या कानांवर विश्वास बसत नाहीये. त्यांच्या या मुलाखतीच्या अनेक क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत. यासोबतच, योगराज सिंग स्वतः X वर ट्रेंड करत आहेत.
हेही वाचा –
हार्दिक-संजू संघात असताना अक्षर पटेलला उपकर्णधार का बनवलं? 3 प्रमुख कारणं जाणून घ्या
बीसीसीआयला नवे सचिव मिळाले, माजी खेळाडूने घेतली जय शाहंची जागा
महाराष्ट्राच्या लेकीनं इतिहास रचला, महिला क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं!