कोणत्याही क्रिकेटपटूसाठी आपल्या क्रिकेट संघाचे नेतृत्त्व करणे, ही अभिमानाची गोष्ट आहे. बऱ्याचशा क्रिकेपटूंना अनपेक्षितपणे या संधी मिळतात. तर काहींकडे पात्रता असूनही त्यांना संधी मिळत नाहीत. अशात भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग याने कर्णधारपदावरून एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. सचिन तेंडूलकरला पाठींबा दिल्यामुळे कशाप्रकारे युवराजला भारतीय संघाचा कर्णधार बनवले गेले नाही, याबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
युवराज (Yuvraj Singh) भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक आहे. २०११ विश्वचषकात तो मालिकावीर राहिला होता. तर २००७ टी२० विश्वचषक विजयातही त्याने महत्त्वाची भूमिका निभावली होती. असे असले तरीही त्याला भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मात्र मिळाली नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
२००७ टी२० विश्वचषकासाठी धोनीला अचानक भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्त केले गेले होते. तत्पूर्वी राहुल द्रविड संघाचा कर्णधार तर युवराज सिंग उपकर्णधार होता. जेव्हा सर्व वरिष्ठ खेळाडूंनी टी२० विश्वचषकातून आपले नाव मागे घेतले होते, तेव्हा युवराज संघाचा कर्णधार बनण्याची अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. त्याच्याजागी धोनीला कर्णधार बनवले गेले.
युवराजच्या मते त्याने ग्रेग चॅपेल आणि सचिन तेंडूलकर यांच्या विवादात तेंडूलकरची बाजू घेतली होती. याच कारणामुळे त्याला भारतीय संघाचा कर्णधार बनता (Yuvraj Singh On Team India Captaincy) आले नाही.
स्पोर्ट्स १८ वर संजय मांजरेकरांशी बोलताना युवराज म्हणाला की, “मी भारतीय संघाचा कर्णधार बनणारच होतो. परंतु तेव्हाच ग्रेग चॅपेल विवाद झाला. त्यावेळी चॅपेल आणि सचिनमध्ये वाजले होते. त्या प्रकरणात मी कदाचित एकमेव असा खेळाडू होतो, ज्याने आपला सहकारी खेळाडू सचिनची साथ दिली होती. परंतु बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांना माझा हा निर्णय पटला नव्हता. त्यांनी म्हटले होते की, कोणालाही कर्णधार बनवले जाईल, पण मला नाही. मी तर हेच ऐकले होते. मला नाही माहिती की, यामध्ये किती सत्य आहे किती असत्य.”
“पण मला अचानक भारतीय संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवले गेले होते. विरेंद्र सेहवाग संघात नव्हता, त्यामुळे एमएस धोनीला कर्णधार बनवले गेले होते. परंतु मला वाटले होते की, मला कर्णधार बनवले जाईल. पण जरी हा निर्णय माझ्या विरोधात असला, तरीही मला त्याची खंत नव्हती. जर आजही माझ्यासोबत असे काही घडले, तर मी माझ्या सहकारी खेळाडूलाच पाठिंबा देईन,” असे पुढे बोलताना युवराजने सांगितले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो धड रनही बनवत नाहीये आणि विकेटही घेत नाहीये’, जडेजाच्या खराब फॉर्मबद्दल माजी दिग्गजाचे वक्तव्य
युवराज आणि पीटरसनमध्ये ट्वीटरवॉर, एकाच्या उत्तराला दुसऱ्याकडून वरचढ प्रत्युत्तर; एकदा वाचा