---Advertisement---

युवराजने पत्नीच्या सांगण्यावरून बदलली हेअरस्टाईल, पाहा नवीन लूकचा व्हिडिओ

On: शनिवार, जून 26, 2021 10:52 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा एक लोकप्रिय खेळाडू आहे. तो ज्यावेळी भारतीय संघाकडून खेळत होता, त्यावेळी त्याला अफाट लोकप्रियता लाभली होती. विशेष म्हणजे त्याने २०१९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर देखील त्याच्या लोकप्रियतेत तसूभरही घट झाली नाही. त्यामुळे अजूनही त्याची प्रत्येकी कृती चाहते बारकाईने फॉलो करतात. नुकताच त्याने आपला नवीन लूक सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर आणला आहे. चाहत्यांनी या लूकवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘या’ खास व्यक्तीच्या सांगण्यावरून बदलला लूक
युवराज सिंगने यापूर्वी लांब केसांची हेअरस्टाईल ठेवली होती. मात्र त्याने एका खास व्यक्तीच्या सांगण्यावरून यात बदल केला आहे. ही खास व्यक्ती म्हणजे युवराजची पत्नी हेजल कीच. हेजलच्या सांगण्यावरून आपल्या हेअर स्टाईलमध्ये युवराजने बदल केला आहे. त्याने लांब केसांवरून कुरळ्या केसांची हेअर स्टाईल केली आहे.

युवराजने ही हेअर स्टाईल बदलतानाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यात कॅप्शन लिहितांना त्याने चाहत्यांना ‘सरळ केस की कुरळे? मला तर हे कुरळे केस आवडले आहेत, तुम्हाला कोणते आवडले?’, असा प्रश्नही विचारला आहे. या नवीन हेअर स्टाईलने त्याची पत्नी हेजल अधिक खुश असल्याचे युवराजने एका स्टोरीतून सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/CQkw8OUjaON/

युवराज सिंगची कारकीर्द
साल २००० मध्ये भारताकडून पदार्पण केलेल्या युवराज सिंगने भारतीय संघाकडून जवळपास १७ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. या कालावधीत त्याने वनडे आणि टी२० सामन्यात विशेष उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने खेळलेल्या ३०४ वनडे सामन्यात ३६.५६ च्या सरासरीने ८७०१ धावा केल्या. यात १४ शतक आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ५८ टी२० सामन्यात त्याने २४.७७ च्या सरासरीने २७५० धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने आपल्या डावखुऱ्या फिरकीने वनडे सामन्यात १११ तर टी२० सामन्यात २८ विकेट्स देखील घेतल्या आहेत. भारताच्या २००७ सालच्या टी२० विश्वचषक विजयात आणि २०११ सालच्या वनडे विश्वचषक विजयात त्याने मोलाचा वाटा उचलला. २०११ सालच्या वनडे विश्वचषकात त्याला मालिकावीर पुरस्कार देखील मिळाला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

आयपीएल अन् पीएसएलमधील बक्षीस रक्कम म्हणजे जमीन-आस्मानाचा फरक; पाहा कोणाला किती मिळते मानधन

“रिषभ पंतच्या रुपात भारताला मिळालाय सुपरस्टार, त्याला बदलू नका”

श्रीलंका दौऱ्यात चमकले नाही तर ‘या’ खेळाडूंना संघातून मिळू शकतो नारळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---