सध्या लॉकडाऊनमुळे खेळाडू सोशल मीडियाकडे वळले आहेत. या माध्यमातूनच ते चाहत्यांंचे मनोरंजन करत आहेत. तसेच चाहत्यांना कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्याचे आवाहनदेखील करत आहेत. गुरुवारी (१४ मे) भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने लोकांना आपापल्या घरात राहण्यासाठी एक व्हिडिओ तयार करून त्यामार्फत संदेश दिला.
याचदरम्यान युवराजने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हरभजन सिंगलादेखील (Harbhajan Singh) स्टे होम (घरात राहण्याचे) चॅलेंज (आव्हान) दिले. तो म्हणाला की, “यामध्ये त्यांना बॅटच्या एका बाजूने चेंडूला सतत उचलावे लागणार आहे. याबरोबर म्हणायचे की, ‘मी कोरोना व्हायरसला पसरण्यापासून थांबविण्यासाठी जोपर्यंत होईल तोपर्यंत घरीच थांबेल.’ तसेच इतर खेळाडूंनाही असे करण्यास सांगायचे आहे.”
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1260931470048129024
युवराजने या चॅलेंजमध्ये (Chellenge) हरभजन, सचिन आणि रोहितला नावाचा समावेश केला. व्हिडिओ संपल्यानंतर युवराज म्हणाला की, हे चॅलेंज सचिन आणि रोहितसाठी सोपे असेल परंतु हरभजनला समस्या येणार आहे.
तरीही हरभजनला असे नाही वाटत. त्याने ट्वीट केले की, “मला हलक्यात घेऊ नको मिस्टर सिंग, मी तुझे आव्हान स्विकारतो.”
Don’t underestimate me Mr Singh.. challenge accepted 💪 https://t.co/VYbna7CkKY
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) May 14, 2020
युवराजने दिलेले हे आव्हान सचिन आणि रोहित पूर्ण करतील का?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
ट्रेंडिंग घडामोडी-
-ना विराट; ना पृथ्वी शाॅ, हाच आहे भारताचा अंडर १९चा टाॅप कर्णधार
-तब्बल ११ देशांविरुद्ध वनडेत शतकं करणारे ३ खेळाडू, एक आहे…
-वनडेत एकाच सामन्यात १७०पेक्षा जास्त चेंडू खेळणारे ५ खेळाडू