भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग हा भारतीय संघाच्या त्या दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे, जे धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक विजयाचा भाग होते. भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये टी२० आणि २०११ मध्ये वनडे विश्वचषकावरती आपले नाव कोरले होते. या दोन्ही विश्वचषकात युवराजने महत्त्वाची कामगिरी केली होती.
नुकत्याच यूट्यूब चॅनलवरील एका मुलाखतीत युवराजने दोन्ही विश्वचषकाशी संबंधीत मजेदार किस्स्यांचा खुलासा केला आहे. यावेळी युवराजने (Yuvraj Singh) २०११च्या वनडे विश्वचषकातील संघ निवडीबाबतची घटना सांगितली आहे. तसेच यादरम्यान त्याने आपल्या आवडत्या कर्णधाराविषयीही सांगितले आहे.
युवराज भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीविषयी (MS Dhoni) बोलताना मुलाखतीत म्हणाला की, “प्रत्येक कर्णधाराचा संघात एक असा आवडता खेळाडू असतो, ज्याला तो महत्त्वाच्या सामन्यात आपल्यासोबत संघात सामाविष्ट करतो. धोनीच्या बाबतीत असा खेळाडू कोण असेल, तर तो आहे सुरेश रैना (Suresh Raina). रैनाला २०११च्या विश्वचषकात सामाविष्ट करण्यासाठी धोनीला मोठ्या डोकेदुखीला सामोरे जावे लागले होते.”
“विश्वचषक २०११साठी संघाची निवड होत होती. त्यावेळी धोनीकडे माझे, यूसुफ पठान (Yusuf Pathan) आणि रैनाचे नाव होते. आम्हा तिघांपैकी धोनीला फक्त २ खेळाडूंना निवडायचे होते. तेव्हा मी आणि यूसुफ चांगल्या फॉर्ममध्ये होतोत. तर, त्यावेळी रैना मात्र खराब फॉर्ममध्ये होता. तरीही त्याला संघात स्थान देण्यात आले आणि यूसुफला ११ जणांच्या संघातून वगळण्यात आले होते,” असेही युवराज यावेळी म्हणाला.
“संघाला त्यावेळी डावखुऱ्या फिरकीपटूची गरज होती आणि मी त्यावेळी चांगल्या लयीत होतो. म्हणून माझे संघातील स्थान निश्चित होते. पण, रैना आणि पठाणपैकी कुणाला संघात स्थान द्यायचे यासाठी धोनीला खूप मेहनत करावी लागली होती,” असेही पुढे बोलताना युवराज म्हणाला.
याव्यतिरिक्त आपल्या आवडत्या कर्णधाराबद्दल बोलताना युवराज म्हणाला की, “बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) माझा आवडता कर्णधार आहे. त्याने मला सर्वांपेक्षा अधिक पाठिंबा दिला आहे. आम्ही युवा खेळाडू होतो. त्यामुळे त्यांनी माझ्यातील प्रतिभाही ओळखली.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-६ षटकार मारले म्हणून माझ्यावर घेतली गेली ही मोठी शंका
-रोहित शर्माला कुणाच्या सर्टिफिकेटची अजिबात गरज नाही
-ब्रायन लारा- सचिन तेंडूलकरमध्ये या खेळाडूला बाद करणे कायमचं कठिण