आजपर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटूंवर बायोपिक बनली आहे. यामध्ये त्यांचा क्रिकेटमधील प्रवास आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगण्यात आलंय. याच क्रमात आता भारतीय दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगच नावही जोडल्या गेलंय.
वास्तविक, काही दिवसांपूर्वीच युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली. मात्र या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका कोणता अभिनेता निभावेल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, युवराज सिंगनं आपल्या भूमिकेसाठी एका अभिनेत्याचं नाव घेतलं. युवराजच्या मते हा अभिनेता त्याची भूमिका योग्यपणे निभावू शकतो. ‘स्पोर्ट्सकिडा’ला दिलेल्या मुलाखतीत युवराजनं त्या अभिनेत्याचं नाव घेतलं, ज्याची त्याला आपल्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत पाहण्याची इच्छा आहे.
युवराज सिंगनं ‘स्पोर्ट्सकिडा’ला दिलेल्या या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली. युवराजला त्याची सध्याची आवडती आयपीएल टीम कोणती? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यानं दिल्ली कॅपिटल्सचं नाव घेतलं. यानंतर त्याला विचारण्यात आलं की, पाकिस्तान टीममधील त्याचा आवडता खेळाडू कोण? यावर युवराजनं शोएब अख्तर असं उत्तर दिलं.
या मुलाखतीत युवराजला त्याच्या बायोपिक संबंधी प्रश्न विचारण्यात आला. तुझ्या बायोपिकमध्ये तुला मुख्य भूमिकेत कोणत्या अभिनेत्याला पाहायला आवडेल? या प्रश्नावर युवराज सिंगनं बॉलिवुड स्टार विक्की कौशलचं नाव घेतलं. आम्ही तुम्हाला सांगतो, युवराज सिंगच्या बायोपिकमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेसाठी दबंग गर्ल फातिमा सना शेखचं नाव समोर येतंय. मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांना अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
सध्या युवराज सिंगचे वडील आणि माजी क्रिकेटपटू योगराज सिंग बरेच चर्चेत आहेत. त्यांनी युवराजला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. “युवराजनं 2011 मध्ये कर्करोगाशी झुंज देत भारताला विश्वचषक जिंकवून दिला, त्यामुळे त्याला भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा”, अशी योगराज सिंग यांची मागणी आहे.
हेही वाचा –
10 वर्षांनंतर भारतीय संघात झहीर खानचा पर्याय! बांगलादेशविरुद्ध संधी मिळणार का?
विराट कोहली माझ्या नेतृत्वाखाली खेळला, ‘मी चांगला क्रिकेटर होतो, पण…’, बड्या नेत्याचा मोठा खुलासा
बांगलादेशच्या नाहिद राणाचा सामना करण्यासाठी कोच गंभीरचा मास्टर प्लान, ताफ्यात नव्या भिडूची एन्ट्री