---Advertisement---

युजवेंद्र चहलने मोडला १६ वर्षांपूर्वीचा नकोसा असा विक्रम…

On: सोमवार, जुलै 1, 2019 5:04 PM
---Advertisement---

बर्मिंगहॅम। इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात भारतीय संघाला रविवारी इंग्लंड विरुद्ध एजबस्टर्न स्टेडियममध्ये खेळाताना 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. हा भारताचा या विश्वचषकातील पहिलाच पराभव आहे. तसेच या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने एक नकोसा विक्रम केला आहे.

चहलने या सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना एकही विकेट न घेता 88 धावा दिल्या. यावेळी त्याचा इकोनॉमी 8.80 होता.

त्यामुळे तो विश्वचषकातील एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच चहलचे हे वनडे कारकिर्दीतीलही सर्वात खराब गोलंदाजी प्रदर्शन ठरले आहे.

याआधी 2003 मध्ये जवागल श्रीनाथ यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध 10 षटके गोलंदाजी करताना 87 धावा दिल्या होत्या.

विश्वचषकात एका सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चहल, श्रीनाथ पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर कार्सन घावरी आहेत. त्यांनी सर्वात पहिल्या विश्वचषकात म्हणजेच 1975 ला इंग्लंड विरुद्ध 83 धावा दिल्या होत्या.

विश्वचषकातील एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज –

88 – युजवेंद्र चहल (2019, विरुद्ध इंग्लंड)

87 – जवागल श्रीनाथ (2003, विरुद्ध इंग्लंड)

83 – कार्सन घावरी (1975, विरुद्ध इंग्लंड)

75 – आर अश्विन (2015, विरुद्ध झिम्बाब्वे)

75 – मोहित शर्मा (2015, विरुद्ध ऑस्ट्रेलिया)

74 – आशिष नेहरा (2003, विरुद्ध पाकिस्तान)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

धोनी-केदारच्या धीम्या खेळीचा विराट-रोहितने केला बचाव

भारताला मोठा धक्का; शिखर पाठोपाठ विजय शंकरही पडला विश्वचषकातून बाहेर!

रिषभ पंतबद्दलच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिले असे मजेशीर उत्तर, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment