भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज उमरान मलिक ऐवजी युझवेंद्र चहल याला संघात सामील केले गेले. चहल मागच्या काही मन्यांमध्ये भारतासाठी जास्त क्रिकेट खेळू सकला नसला, तरी रविवारी (29 जानेवारी) न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याला संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोनेही केले. चहलचे आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटधील प्रदर्शन जबरदस्त राहिले असून न्यूझीलंडविरुद्ध एक विकेट घेताचा त्याने मोठा विक्रम नावावर केला.
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅटनर (Mitchell Santner) याने नाणेपेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची पहिली विकेट पुनरागमन करणाऱ्या युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यानेच घेतली. न्यूजीलंडचा सलामीवीर फिन एलन (Finn Allen) अवघ्या 11 धावा करून चहलच्या चेंडूवर विकेट गमावून बसला. इंग्लंडच्या डावातील पाचव्या षटकात चहल गोलंदाजीला आला आणि त्याने सलामीवीर फलंदाजाला त्रिफळाचीत केले. चहलच्या टी-20 आंतरारष्ट्रीय कारकिर्दीतील ही त्याची 91 वी विकेट होती आणि तो या फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला.
सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याच्या बाबतीत दिग्गज भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) आणि युझवेंद्र चहल यापूर्वी बरोबरीवर होते. पण फिन एनल चहलच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर भुवनेश्वर या शर्यतीत मागे पडला. चहलच्या नावावर आता एकूण 91* टी-20 विकेट्स घेतल्या असून यादीत दुसऱ्या क्रमांकावरील भुवनेश्वर कुमारने 90 विकेट्स घेतल्या आहेत. यादीत तिसऱ्या क्रमांकावर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आहे. अश्विनच्या नावावर आतापर्यंत 72 टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्सची नोंद आहे. 70 आणि 64 विकेट्सह जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) चौथ्या, तर हार्दिक पंड्या (hardik Pandya) पाचव्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तरत भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतरही चांगली सुरुवात केली. लखनवूमध्ये केळल्या जाणाऱ्या या सामन्यात खेळपट्टील भारतीय गोलंदाजांच्या साथ असल्याचे पाहायला मिलाले. न्यूझीलंडने अवघ्या 48 धावा करून चार विकेट्स गमावल्या. न्यूझीलंडचे सलामीवीर फिन एलन आणि डेवॉन कॅनवे यांनी प्रत्येक 11-11 धावा करून विकेट्स गमावल्या. तर मध्यक्रमातील ग्लेन फिलिप्स आणि डार्ली मिचेल यांनी अनुक्रमे 5 आणि 8 धावांची खेळी केली. (Yuzvendra Chahal became the bowler who took the most wickets in the match in T20 international cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या सामन्यात भारताने गमावली नाणेफेक, टीम इंडियापुढे मालिका हातात ठेवण्याचे आव्हान
U19 टी20 वर्ल्डकप: भारतीय मुली इतिहास रचण्याच्या नजीक; विश्वविजयासाठी केवळ 69 धावांचे आव्हान






