भारतीय क्रिकेट संघाचा लेग स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहल आज (23 जुलै) आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. युझवेंद्रचे जन्म 23 जुलै 1990 हरियाणा मधील रोहतक जिल्ह्यात झाला आहे.
चहलचे क्रिकेट करिअर खूप लहानपणापासूनच सुरु झाले आहे. खूप संघर्ष आणि अडचणीवर मात केल्यानंतर त्याला यश मिळाले आहे. हे तर सर्वांनाच माहिती आहे की, युझवेंद्र चहल क्रिकेटर आहे. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की तो आयकर विभागात एक इन्स्पेक्टरही आहे. अशा परिस्थितीत आज त्याचा वाढदिवस देखील आहे. चला तर मग या बातमीद्वारे जाणून घेऊयात चहलच्या नावावर असलेले क्रिककेटमधील महान विक्रम.
युझवेंद्र चहलचे क्रिकेटमधील महान पाच विक्रम-
1. टी20 मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी- युझवेंद्र चहलने टी20 क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यांच्यामध्ये सर्वात संस्मरणीय विक्रम म्हणजे टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारताची सर्वोत्तम गोलंदाजी. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने 25 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
2. वनडेत 50 विकेट घेणारा सर्वात वेगवान भारतीय फिरकी गोलंदाज- युझवेंद्र चहल वनडेमध्ये सर्वात जलद 50 बळी घेणारा भारतीय फिरकी गोलंदाज ठरला. 24 वा एकदिवसीय सामना खेळताना त्याने ही कामगिरी केली आणि यादरम्यान त्याने अजित आगरकरचा विक्रम मोडला.
3. टी20 मालिकेत चहल संयुक्तपणे सर्वाधिक बळी- कुलदीप यादवसोबत युझवेंद्र चहल हा भारतीय गोलंदाज आहे ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत 14 बळी घेतले आहेत. 18 जानेवारी 2019 रोजी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा विक्रम केला.
4. वनडेमध्ये भारताकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाजी- युझवेंद्र चहलने 2019 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 42 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या. या कालावधीत, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी करणारा गोलंदाज ठरला.
5. टी20 मध्ये 6 बळी घेणारा चहल हा पहिला भारतीय फिरकी गोलंदाज – युझवेंद्र चहलने टी20 क्रिकेटमध्ये 6 विकेट घेत इतिहास रचला. 2017 मध्ये, चहलने इंग्लंडविरुद्ध 6 विकेट घेतल्या आणि आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 6 विकेट घेणारा पहिला भारतीय फिरकी गोलंदाज ठरला.
यासह भारतीय संघाच्या या लेग स्पीनरच्या नावे आयपीएल मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. चहलने 145 सामन्यात 187 विकेट्स घेतल्या आहेत. त्यासोबतच चहल टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक घेणारा गोलंदाज देखील आहे. टीम इंडियासाठी त्याने 80 टी20 सामन्यात 96 विकेट्स घेतल्या आहेत. आश्चर्यकारक म्हणजे या स्टार गोलंदाजाने आतापर्यंत भारतासाठी एकही टी20 विश्वचषक खेळलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं पदक खेळाडू दातांनी का चावतात? हा नियम आहे की परंपरा? जाणून घ्या
“मोठ्यांना कसे बोलावे शिकवले नाही का?” माजी पाकिस्तानी खेळाडूनं मोहम्मद शमीला खडसावलं
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, स्टार खेळाडूचं दोन वर्षांनंतर पुनरागमन






