आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ विश्वचषकातील त्यांच्या अभियानाला २४ ऑक्टोबरपासून सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. पण विश्वचषकापूर्वी संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. विश्वचषकासाठी संधी दिली गेलेल्या वरुण चक्रवर्तीला स्पर्धेतून माघार घ्यावी लागू शकते. तो सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी खेळत असून यादरम्यान त्याच्या गुडघ्याला यापूर्वी झालेली दुखापत पुन्हा एकदा उद्भवली आहे.
वरुण चक्रवर्तीच्या दुखापतीमुळे भारतीय संघात बदल होण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. आयसीसीच्या नियमांप्रमाणे टी२० विश्वचषकात सहभागी होणारे देश १० ऑक्टोबरपर्यंत त्यांनी निवडलेल्या संघात बदल करू शकतात. अशात जर वरुण चक्रवर्तीने माघार घेतली, तर फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला विश्वचषक खेळण्याची संधी मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
युजवेंद्र चहलला आगामी टी२० विश्वचषक संघात सामील केले गेले नाहीये. चहलला संधी न दिल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र, आता चहलची विश्वचषकात खेळताना दिसण्याची शक्यता निर्माण झाला आहे. चहल भारतात आयोजित केलेल्या आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात ७ सामने खेळला होता आणि केवळ ४ विकेट घेऊ शकला होता.
मात्र, त्यानंतर त्याने त्याच्या प्रदर्शनात सुधार केलेला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यावर त्याने संघासाठी चांगले प्रदर्शन केले होते. तसेच आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही त्याने जबरदस्त प्रदर्शन केले आहे आणि टी२० विश्वचषकासाठी संधी न देणाऱ्या निवडकर्त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. चहलने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात ६ सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या आहेत.
चक्रवर्तीच्या जागेवर वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळेल असाही अंदाज लावला जात आहे. सुंदरला झालेल्या दुखापतीमुळे तो आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊ शकला नव्हता. दुखापतीमुळे त्याला टी२० विश्वचषकासाठीही निवडले गेले नव्हते. मात्र, आता तो पूर्णपणे फिट झाला आहे आणि खेळण्यासाठी तयार आहे. तो ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तामिळनाडू संघासाठी खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
गोलमाल है भाई…! एकीकडे पटापट विकेट्स जात असताना राजस्थानच्या ताफ्यात सुरू होता भलताच गोंधळ
टी२० विश्वचषकात ‘हे’ असतील पंच आणि सामना रेफरी, भारताच्या फक्त एकाच अंपायरला संधी
टी२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानचा रडीचा डाव, जर्सीवरुन हटवले भारताचे नाव; फोटो व्हायरल