शुक्रवारी (२४ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघावर ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात ३ गडी बाद करणारा ड्वेन ब्रावो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. दरम्यान हा सामना झाल्यानंतर एमएस धोनी आणि युझवेंद्र चहलचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आयपीएल स्पर्धेत अनेकदा पाहिले गेले आहे की, सामना झाल्यानंतर एमएस धोनी युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत असतो. असाच काहीसा प्रकार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर देखील पाहायला मिळाला. हा सामना झाल्यानंतर एमएस धोनी आणि युझवेंद्र चहल एकमेकांसोबत चर्चा करताना दिसून आले होते. ज्याचा फोटो चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
U Z there is always a light moment post match!#RCBvCSK #WhistlePodu #Yellove ???????? pic.twitter.com/Rdv6ECFG0p
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 25, 2021
धोनी आणि युवा खेळाडूंचे सामना झाल्यानंतर एकत्र येऊन गप्पा मारणे काही नवीन नाहीये. क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेला धोनी नेहमीच आपला अनुभव युवा खेळाडूंसोबत शेअर करत असतो. तसेच युवा खेळाडू देखील ही संधी गमवत नाही. चहलपुर्वी अनेक युवा क्रिकेटपटूंना धोनीने मार्गदर्शन केले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. धोनीव्यतिरिक्त चहलने संघातील इतर शिलेदार जसे की, शार्दुल ठाकूरसोबत वेळ घालवला आहे.
तसेच या सामन्यात विराट कोहली आणि एमएस धोनी यांची घट्ट मैत्री देखील पाहायला मिळाली होती. नाणेफेकीच्या वेळी वाळूचे वादळ आले होते, ज्यामुळे नाणेफेक करण्यात उशीर झाला होता. त्यावेळी ही दोघेही कर्णधार गप्पा मारताना दिसून आले होते. तर सामना झाल्यानंतर देखील विराट कोहली एमएस धोनीला मिठी मारताना दिसून आला होता.
MSDian Virat Kohli Hugging @MSDhoni after the match..❤ pic.twitter.com/Va27QDpn8w
— Dhoni Army TN™ (@DhoniArmyTN) September 24, 2021
You can't end CSK vs RCB match without Kohli – Dhoni moment. pic.twitter.com/IlCjzlMSnP
— Johns. (@CricCrazyJohns) September 24, 2021
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक ७० तर विराट कोहलीने ५३ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला २० षटक अखेर ६ बाद १५६ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना, चेन्नई सुपर किंग्स संघाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ३८ तर अंबाती रायुडूने ३२ धावांचे योगदान दिले. हा सामना चेन्नई सुपर किंग्स संघाने ६ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सवर दु:खाचा डोंगर! ‘या’ माजी खेळाडूच्या वडिलांचे निधन, क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
आयपीएलमुळे टीम इंडियाला मिळणार अजून एक उच्चशिक्षित क्रिकेटर, पाहा इतर एज्युकेटेड खेळाडूंची नावे
प्लेऑफमधून सर्वात आधी बाहेर होणाऱ्या SRHच्या खात्यात कोणालाही नको असलेला ‘लाजिरवाणा’ विक्रम






