भारताचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या त्याच्या गोलंदाजीमुळे नाही तर सोशल मीडियावरील विविध ऍक्टिव्हिटींमुळे चर्चेत आहे. मधे तो त्याच्या टिक-टॉक व्हिडिओमुळे तसेच इंस्टाग्रामवरील लाईव्ह चॅट सेशनमुळे चर्चेचा विषय बनला होता.
पण आता तो विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या एका व्हिडिओ पोस्टवर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चेत आला आहे.
शुक्रवारी अनुष्काने विराटला मैदानातील अनुभव देणारा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. ती या व्हिडिओमध्ये ‘कोहली, ए कोहली चौका मारना चौका, क्या कर रहा हैं, ए कोहली’ हे एखादा चाहता जसा बोलतो तशा सुरात बोलत होती.
तसेच तिने या व्हिडिओला कॅप्शन दिले होते की ‘मी विचार केला की त्याला मैदानाची आठवण येत असेल. त्याला लाखो चाहत्यांचे प्रेम मिळते पण त्याला या एका विशिष्टप्रकारच्या चाहत्याची आठवण येत असेल. त्यामुळे मी त्याला हा अनुभव दिला.’
https://www.instagram.com/p/B_EwaTjJL-G/
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तसेच अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रियाही दिल्या. यामध्ये चहलचाही समावेश आहे. चहलने त्याला सलामीला फलंदाजीसाठी पाठव असे विराटला सांगण्याची विनंती अनुष्काला केली.
‘स्वयंघोषित’ फलंदाज चहलने अनुष्काच्या या पोस्टवर गमतीने लिहिले आहे की ‘भाभी, प्लीज पुढच्या वेळी म्हणा की चहलला सलामीला फलंदाजीला पाठव, आशा आहे की तूमचे ऐकेल.’ (Next time bhabhi please say chahal ok opening Kara na chahal ko I wish aapki sun le )
चहलच्या प्रतिक्रियेवरही अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. चहलने याआधीही अनेकदा अशाच प्रकारच्या गमतीदार प्रतिक्रिया विविध खेळाडूंच्या पोस्टवर दिल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
विशेष लेख: खरंच गेल्या १२ वर्षात आयपीएलमुळे एकंदरीतच आयुष्य, क्रिकेट खूप(च) बदलून गेलं नै
जगातील टाॅप ५ श्रीमंत क्रिकेट लीग, जिथे क्रिकेटर्स होतात करोडपती
आयपीएलचे तब्बल ११ हंगाम एकाच संघाकडून खेळलेला तो एकमेव खेळाडू