भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेतील तिसरा सामना भारताने जिंकला. पहिल्या दोन सामन्यात अपेक्षित प्रदर्शन न करू शकलेले भारतीय गोलंदाज तिसऱ्या सामन्यात मात्र चमकले. फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलच्या प्रदर्शनाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. चहलने या सामन्यात तीन विकेट्स घेतल्या आणि सामनावीर ठरला. सामन्यातील प्रदर्शनानंतर चहलने खास प्रतिक्रिया दिली.
फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने टी-२० मालिकेतील या तिसऱ्या सामन्यात २० धावा खर्च करून ३ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. या प्रदर्शनासाठी त्याला सामना संपल्यानंतर सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले. सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर चहलने सांगितले की, या सामन्यात त्याने स्वतःच्या गोलंदाजीमध्ये थोडा बदल केला, ज्यामुळे त्याला यश मिळाले. त्याने सांगितले की, मागच्या सामन्यात त्याने खूप स्लाईडर गोलंदाजी केली होती आणि चेंडूची गती देखील जास्त होती. याच कारणास्तव चेंडूला स्पिन मिळत नव्हता.
चहलने सांगितले की,” मालिकेतील तिसऱ्या सामन्या त्याने चेंडू पकडण्याची पद्धत देखील बदलली. त्याला माहिती आहे चेंडू फिरवणे आणि खाली डिप करणे ही त्याच्या गोलंदाजीची ताकद आहे. त्यामुळेच त्याने या सामन्या चेंडू फिरवण्याचा प्रयत्न केला आणि गतीही कमी ठेवली.” त्याव्यतिरिक्त चहलने वेगळे काही करण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा फलंदाज रिवर्स स्वीप खेळतो, तेव्हा गोलंदाजासाठी अडचणी वाढतात, पण चहलकडे यासाठी दुसरी रणनीती आ,हे तो त्याच हिशोबाने क्षेत्ररक्षण लावतो.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चहलने २६ धावा खर्च केल्या होत्या आणि एकही विकेट घेतली नव्हती. तर दुसऱ्या सामन्यात तब्बल ४९ धावा खर्च करून १ विकेट घेतली होती. चहलने मान्य केले की, मागच्या सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी केली नाही. त्या प्रदर्शानंतर प्रशिक्षकांनी त्याला सांगितले होते की, स्वतःच्या जमेच्या बाजूवर लक्ष केंद्रीत कर आणि त्याने देखील तसेच केले.
टी-२० मालिकेचा चौथा सामना १७ जून रोजी राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. चहलने सांगितल्याप्रमाणे राजकोटमधील मैदान खूप मोठे आहे. भारताला हा टी-२० मालिका जिंकण्यासाठी पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंड दौऱ्यात भारतीय कर्णधार खेळणार का?
आर्थिक संकटात अडकलेल्या श्रीलंकेला आता फक्च क्रिकेटच वाचवू शकतं, कसं ते वाचा सविस्तर