मुंबई। सोमवारी (१८ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ३० वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. या सामन्यात राजस्थानने ७ धावांनी विजय मिळवला. राजस्थानच्या या विजयात शतक करणाऱ्या जोस बटलर बरोबरच फिरकीपटू युजवेंद्र चहल यानेही मोलाचा वाटा उचलला. त्याच्यासाठी हा सामना विक्रमी ठरला. त्याने या सामन्यात हॅट्रिक घेण्याबरोबरच ५ विकेट्स घेतल्या.
चहलची पहिली आयपीएल हॅट्रिक
या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता समोर २१८ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. पण कोलकाताच्या फलंदाजांनीही चांगली कामगिरी करत हे आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, १७ व्या षटकात चहल (Yuzvendra Chahal) गोलंदाजीला आला आणि त्याने सामन्याचे पारडेच राजस्थानच्या बाजूने फिरवले (RR vs KKR).
त्याने या षटकातींल शेवटच्या सलग तीन चेंडूंवर श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्स यांना बाद केले आणि आयपीएलमधील आपली पहिली हॅट्रिक (IPL Hat-Trick) साजरी केली. त्याने ही हॅट्रिक घेतल्यानंतर अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशनही केले. त्याच्या मैदानात बसण्याच्या प्रसिद्ध झालेल्या अनोखी स्टाईलनेच यावेळी त्याने सेलिब्रेशन केले.
विशेष म्हणजे, याच षटकात पहिल्या चेंडूवर त्याने वेंकटेश अय्यरलाही बाद केले होते. त्याने या सामन्यांत ४० धावा देत एकूण ५ विकेट्स घेतल्या. त्याची १७ व्या षटकांतील गोलंदाजी पाहून स्टँडमध्ये बसलेली त्याची पत्नी धनश्री देखील जोरदार सेलिब्रेशन करताना दिसली.
Special feat deserves special celebration! 🙌🙌
Hat-trick hero @yuzi_chahal! 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/f4zhSrBNHi#TATAIPL | #RRvKKR | @rajasthanroyals pic.twitter.com/NhAmkGdvxo
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022
अशी घेतली चहलने हॅट्रिक
चहलने १७ व्या षटकांतील पहिला चेंडू गुगली टाकत वेंकटेश अय्यरला बाद केले होते. तो यष्टीचीत होत माघारी परतला होता. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूत चहलने केवळ १ धाव दिली. त्याने चौथा चेंडू वाईड टाकल्याने त्याला पुन्हा हा चेंडू टाकावा लागला. पण त्याने याच चेंडूवर खेळपट्टीवर पूर्णपणे स्थिरावलेल्या श्रेयस अय्यरला पायचीत पकडले. त्यामुळे श्रेयसला ८५ धावांवर पॅव्हेलियनची वाट धरावी लागली.
त्याच्या पुढच्याच चेंडूवर चहलने शिवम मावीला माघारी धाडले. मोठा फटका मारायच्या नादात मावी रियान परागच्या हातात झेल देत बाद झाला, तर षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चहलने पॅट कमिन्सला बाद केले. चहलने कमिन्ससाठी लेग ब्रेक चेंडू टाकला होता, ज्यावर कमिन्स कव्हरला शॉट खेळण्याचा प्रयत्नात होता. पण चेंडू त्याच्या बॅटची कडा घेत यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या हाती गेला. त्यामुळे कमिन्सही बाद झाला आणि चहलने हॅट्रिक पूर्ण केली.
Hat-Trick Boy Chahal on Fire🔥🔥🔥
What can be a match changing over, Watch It!!!🥰🥰#RRvKKR #JosButtler #HallaBol #chahal pic.twitter.com/vwE1fFGts7— Chirayu Khandelwal (@Chirayu__003) April 18, 2022
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
राजस्थानने जिंकला सामना
या सामन्यात राजस्थानकडून जोस बटलरने १०३ धावांची खेळी केली होती. त्यामुळे राजस्थानने २० षटकांत ५ बाद २१७ धावा केल्या आणि कोलकाता समोर २१८ धावांचे आव्हान ठेवले. कोलकाताकडून सुनील नारायणने २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताकडून श्रेयस अय्यर व्यतिरिक्त ऍरॉन फिंचने ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली. पण चहलच्या ५ विकेट्समुळे कोलकाताला १९.४ षटकांत सर्वबाद २१० धावाच करता आल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! ख्रिस्तियानो रोनाल्डोवर कोसळला दु:खाचा डोंगर, मुलाचे झाले निधन; वाचा सविस्तर
अशा ६ घटना जेव्हा नाईटवॉचमन म्हणून खेळायला आलेल्या क्रिकेटपटूने केले शतक