भारताने न्यूझीलंड विरुद्धचा वेलिंगटचा सामना 35 धावांनी जिंकत पाच सामन्यांची वन-डे मालिका 4-1 अशा मोठ्या फरकाने जिंकली.
या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक नाबाद 18 धावा करत संघाला 92 धावसंख्या उभारण्यास मदत केली होती. यावेळी त्याने कुलदीप यादवसोबत केलेली 25 धावांची भागीदारीही भारताची त्या सामन्यातील मोठी भागीदारी ठरली होती.
मात्र हा सामना भारताने 8 विकेट्सने गमावला होता. पण या सामन्यातील उत्तम फलंदाजीमुळे चहलने भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माला एक विचित्र प्रश्न विचारला.
वेलिंगटनचा पाचवा वनडे सामना झाल्यावर चहलने रोहितला चहल टीव्हीवर बोलावले होते. यामध्ये त्याने रोहितला विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मला टी20 मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी मिळेल का असा प्रश्न विचारला होता.
यावेळी रोहितने चहलला प्रत्युत्तर देताना म्हटले, ‘चहल हा आमचा मागच्या सामन्यातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून त्या सामन्यात आम्ही पराभूत झालो. आम्ही जो सामना जिंकणार त्या सामन्यात तू सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असावा असे मला वाटते. तिसऱ्या क्रमांकावरच्या फलंदाजीबद्दल मी रवी यांच्याशी बोलतो.’
WATCH: Hitman @ImRo45's guest appearance on Chahal TV 😁😁
Why does Rohit want to give @yuzi_chahal a batting promotion? – by @RajalArora
Find out here 👉👉👉 https://t.co/3T5E4KDGEx pic.twitter.com/iI9IZmkoV1
— BCCI (@BCCI) February 3, 2019
न्यूझीलंड विरुद्धच्या 5व्या सामन्यात परत एकदा भारताचे 4 विकेट्स लवकर पडल्या होत्या. पण अंबाती रायडू, विजय शंकर, केदार जाधव आणि हार्दिक पंड्या यांनी उत्तम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर 253 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात चहलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडिया विरुद्धच्या टी२० मालिकेला न्यूझीलंडचा हा स्पोटक खेळाडू मुकणार, जाणून घ्या कारण
–एमएस धोनीसह या भारतीय क्रिकेटपटूंची झाली वनडे क्रमवारीत सुधारणा
–पुणेकर केदार जाधवसाठी एमएस धोनीचा मराठमोळा अंदाज, पहा व्हिडिओ