इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या 54व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला 6 विकेट्सने पराभवाची धूळ चारली. या सामन्यात मुंबईच्या विजयात सूर्यकुमार यादव याने मोलाचे योगदान दिले. त्याने 35 चेंडूत 83 धावांची वादळी फलंदाजी केली. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. या खेळीनंतर अनेक आजी-माजी दिग्गजांनी त्याचे कौतुक केले. यामध्ये भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याचाही समावेश आहे.
सूर्यकुमार यादव याच्या शानदार फलंदाजीपुढे आरसीबी संघाचे गोलंदाजांनी नांग्या टाकल्या. गोलंदाजाच्या तिखट माऱ्यापुढे सूर्या डोंगरासारखा उभा राहून मैदानात चारही बाजूला फटकेबाजी करत होता. अशात भारताचा माजी खेळाडू झहीर खानने सूर्यकुमार यादवची प्रशंसा (Zaheer Khan Praise Suryakumar Yadav) केली. तो म्हणाला की, सूर्यकुमारला रोखणे गोलंदाजांसाठी खूपच कठीण होते.
‘सूर्यकुमारने अपेक्षेपेक्षा खूप चांगली कामगिरी केली’
जिओ सिनेमावर बोलताना झहीर खान (Zaheer Khan) म्हणाला की, “त्याला बॅट मागून पकडण्याची आणि पाय स्थिर ठेवण्याची गरज होती. तो अशाप्रकारे फलंदाजी करत होता. हा कठीण काळ होता, पण जेव्हा त्याने लय पकडली, तेव्हा त्याने अपेक्षेपेक्षा खूप शानदार कामगिरी केली. मात्र, गोलंदाजांसाठी ही चांगली बातमी नाहीये.”
“तो ज्याप्रकारे फलंदाजी करतो आणि ज्याप्रकारे दृष्टिकोन ठेवतो, तेव्हा कसेही क्षेत्ररक्षण लावले, तर त्याची काही मदत होऊ शकत नाही. प्रत्येकवेळी मी त्याला खेळताना पाहतो, तेव्हा असे वाटते की, गोलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही स्कायला चौकार मारण्यापासून रोखू शकत नाहीत,” असेही पुढे बोलताना झहीर खान म्हणाला.
सामन्याविषयी थोडक्यात
या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावत 199 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 16.3 षटकात 4 विकेट्स गमावत 200 धावा केल्या. तसेच, सामना 6 विकेट्सने खिशात घातला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत थेट तिसरे स्थान पटकावले. पुढील सामन्यांमध्येही संघाला सूर्यकुमारकडून अशाच खेळीची अपेक्षा असेल. (zaheer khan praise suryakumar yadav said this know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ODI World Cup 2023च्या तारखा आल्या समोर, ‘या’ दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान, जाणून घ्याच
मैदानावर कार्तिकसोबत घडलेल्या प्रकाराबाबत RCB कोचचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘त्याला उलटी…’






