---Advertisement---

तब्बल ७ फूट ४ इंच उंची लाभलेली चौदा वर्षाची बास्केटबॉलपटू, व्हिडिओ होतोय व्हायरल

On: शनिवार, जुलै 17, 2021 11:52 PM
---Advertisement---

सर्वाधिक उंच खेळाडूंचा समावेश असलेला खेळ म्हणून बास्केटबॉलकडे पाहिले जाते. या खेळासाठी कौशल्यांसोबत शारीरिक उंची आणि सुदृढता देखील आवश्यक असते. मात्र, कधीकधी या बास्केटबॉल कोर्टवर काही अचंबित करणारे खेळाडू देखील आपल्याला दिसून येतात. अशीच एक युवा बास्केटबॉल खेळाडू सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय. चीनमधील एका स्पर्धेत उतरलेल्या अवघ्या १४ वर्षाच्या या मुलीला तब्बल ७ फूट ४ इंच अशी उंची लाभली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ
चीनमध्ये सध्या चौदा वर्षाखालील मुलींची बास्केटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धा सुरू आहे. चीनमधील हुबेई प्रांतातील जिंगजोऊ येथील या स्पर्धेमध्ये झेंग झिऊ ही १४ वर्षाची तब्बल ७ फूट ४ इंच उंचीची मुलगी खेळताना दिसून आली. तिने या सामन्यात २५ रिबाऊंड व ६ ब्लॉक करत ४२ पॉईंट मिळवले.

 

सोशल मीडियावर आल्या अशा प्रतिक्रिया
झेंग झिऊ हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने म्हटले, ‘आजकालची ही मुलं काय खातात हे माहीत नाही.’

अन्य एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, ‘मी आजवर पाहिलेली ही सर्वात अनोखी गोष्ट आहे.’ अशाप्रकारे अनेक चाहते या व्हिडिओवर व्यक्त होत आहेत.

झेंग झिऊला मिळाला बास्केटबॉलचा वारसा
झेंग झिऊ ही पूर्व चीनमधील शॅन्डोंग प्रांतातील असल्याचे सांगितले जात आहे. तिचे आई आणि वडील दोघेही बास्केटबॉलपटू आहेत. तिच्या वडिलांची उंची ६ फूट ९ इंच तर, आईची उंची ६ फूट ४ इंच आहे. तिचा हा व्हिडिओ एका रात्रीत तब्बल १.२ दशलक्ष लोकांनी पाहिला. अनेक जण तिची तुलना प्रसिद्ध चायनीज बास्केटबॉलपटू यावो मिंग याच्याशी करत आहेत. विशेष म्हणजे त्याची उंची देखील इतकीच आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारत आणि श्रीलंकेतील आजवरचा सर्वात रोमांचक वनडे; झाल्या होत्या ८०० पेक्षा अधिक धावा

संजू सॅमसनची सराव सामन्यात तडाखेबंद फलंदाजी; भुवनेश्वर, सैनी सारख्या गोलंदाजांची केली धुलाई, पाहा व्हिडिओ

भारत-श्रीलंका संघातील पहिल्या वनडेत येणार का पावासाचा व्यत्यय? पाहा काय आहे हवामानाचा अंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---