ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकातील साखळी फेरीचे सामने समाप्त झाले आहेत. साखळी फेरीनंतर भारत, पाकिस्तान, इंग्लंड व न्यूझीलंड या चार संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. पात्रता फेरीपासून मुख्य फेरीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या झिम्बाब्वे संघाने देखील आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली. झिम्बाब्वेच्या या उत्कृष्ट कामगिरीमध्ये अनुभवी अष्टपैलू सिकंदर रझा (Sikandar Raza) याचे महत्त्वाचे योगदान राहिले. त्याने संपूर्ण विश्वचषकात शानदार कामगिरी करत स्पर्धेच्या मानकरी पुरस्कारासाठी दावेदारी ठोकली आहे.
झिम्बाब्वे संघाने 2022 मध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली. टी20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीत त्यांनी आयर्लंड व स्कॉटलंड यांना पराभूत करत मुख्य फेरीत धडक मारलेली. मुख्य फेरीत पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्याची किमया त्यांनी केली. तसेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यांना एक गुण मिळाला होता. तर भारत, नेदरलँड्स व बांगलादेशने त्यांना पराभूत केले.
झिम्बाब्वे संघ उपांत्य फेरीत पोहोचला नसला तरी, सिकंदर रझाने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात जबरदस्त कामगिरी करून दाखवली. पात्रता फेरीतील तीन तसेच मुख्य फेरीतील पाच सामने असे आठ सामने त्याने या स्पर्धेत खेळले. 27.37 च्या चांगल्या सरासरीने व एका अर्धशतकाच्या मदतीने त्याने 219 धावा काढल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 147.97 असा जबरदस्त राहिला. स्पर्धेत साखळी फेरीनंतर सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये तो चौथ्या स्थानी आहे.
त्याच्या गोलंदाजीची आकडेवारी देखील तितकीच उल्लेखनीय दिसून येते. त्याने या 8 सामन्यात 15.60 च्या सरासरीने 10 बळी मिळवले. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट केवळ 6.50 असा राहिला. स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सॅम करन व अर्शदीप सिंग यांच्यासह संयुक्तरीत्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. ( Zimbabwe All Rounder Sikandar Raza Show All Round Performance In 2022 T20 World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो संघात असणे म्हणजे हत्ती पोसण्यासारखे’; दिग्गजाचे बवुमावर जहरी टीकास्त्र
VIDEO: ‘बस झाले’, चाहत्यांना पाहून विराटने जोडले हात; कोहलीची क्यूट रिऍक्शन व्हायरल