---Advertisement---

चुरशीच्या सामन्यात झिम्बाब्वेकडून पाकिस्तान पराभूत; बाबर आझमचे शतक व्यर्थ

On: बुधवार, नोव्हेंबर 4, 2020 11:28 AM
---Advertisement---

पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा वनडे सामना मंगळवारी (3 नोव्हेंबर) रावळपिंडी येथे झाला. या रोमांचक सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला.

झिम्बाब्वेने केली प्रथम फलंदाजी
प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 20 षटकांत 6 बाद 278 धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेचा फलंदाज सीन विल्यमसनने 155 चेंडूंत 118 धावांची नाबाद खेळी करत मोलाचे योगदान दिले होते. हे त्याचे कारकिर्दीतील चौथे शतक होते.

https://twitter.com/ICC/status/1323573497197744130?s=19

पाकिस्तानने सामना केला बरोबरीत
प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघाची सुरुवात खराब झाली. संघांचे सलामीवीर इमाम उल हक आणि फखर झमान हे लवकरच बाद झाले. कर्णधार बाबर आझमने (125 धावा) अष्टपैलू वहाब रियाझ (52 धावा) सोबत खेळून डाव सावरला. मात्र, शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या या सामन्यात पाकिस्ताननेही 278 धावा केल्या आणि हा सामना बरोबरीत झाला.

सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानने केल्या 2 धावा
पाकिस्तानच्या संघाला सुपरओव्हरमध्ये अवघ्या दोन धावा करता आल्या. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज मुझरबानीने सुपर ओव्हरमध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याने सुपर ओव्हरमध्ये टाकलेल्या षटकातील पूर्ण सहा चेंडूही पाकिस्तानचे खेळाडू खेळू शकले नाहीत. इफ्तिखार अहमद आणि खुशदिल शाह हे पाकिस्तानी फलंदाज लवकरच बाद झाले.

झिम्बाब्वेने मिळवला विजय
झिम्बाब्वेला 6 चेंडूत 3 धावांची गरज होती. झिम्बाब्वेचे फलंदाज ब्रेंडन टेलर आणि सिकंदर रजा यांनी सुपर ओव्हरमध्ये अवघ्या तीन चेंडूत संघाला सहजपणे विजय मिळवून दिला.

बाबर आझमचे शतक व्यर्थ
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली.सलामीवीर इमाम उल हक (4 धावा) आणि फखर झमान (3 धावा) हे लवकरच तंबूत परतले. अवघ्या 88 धावांवर पाकिस्तानचा निम्मा संघ बाद झाला होता. कर्णधार बाबर आझमने 125 चेंडूत 125 धावा फटकावल्या. हे बाबर आझमच्या कारकिर्दीतील 12 वे शतक होते. त्याचबरोबर अष्टपैलू वहाब रियाझनेही 52 धावा केल्या. बाबरच्या शतकानंतरही पाकिस्तान विजय मिळवण्यात अपयशी ठरला.

https://twitter.com/TheRealPCB/status/1323631279494103041?s=19

पाकिस्तानने जिंकली वनडे मालिका
या पराभवानंतरही पाकिस्तानने 3 सामन्यांची वन-डे मालिका 2-1 ने जिंकली. पहिल्या वनडेमध्ये पाकिस्तानने 26 धावांनी विजय मिळविला होता. त्याचबरोबर दुसर्‍या वनडे पाकिस्तानने सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला होता.

मुजरबानी याने पटकावला सामनावीराचा पुरस्कार
या सामन्यात झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज मुजरबानी याने 49 धावत 5 गडी बाद केले.ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. त्याच्या या कामगिरीमुळेच त्याची सामनावीर म्हणून निवड झाली.

बाबर आझमची मालिकावीर म्हणून निवड
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या मालिकेत सर्वाधिक 221 धावा केल्या. त्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

पाकिस्तान-झिम्बाब्वे यांच्यात होईल टी20 मालिका
दोन्ही संघ टी20 मालिका खेळतील. पहिला टी20 7 नोव्हेंबरला, दुसरा 8 नोव्हेंबरला आणि तिसरा 10 नोव्हेंबरला खेळला जाईल. तिन्ही सामने रावळपिंडीमध्ये खेळले जातील.

महत्त्वाच्या बातम्या-

-रन आऊट तर तुम्ही खूप पाहिले असतील! पण पाकिस्तानी खेळाडूंच्या ‘या’ कारनाम्याला तोड नाही

-VIDEO : षटकारांचं काय कौतुक, ‘हा’ चौकार पाहून तुम्हीच म्हणाल नाद खुळा !!

-एकेवेळी करणार होता आत्महत्या; आता करणार भारतीय फलंदाजांच्या दांड्या गुल

ट्रेंडिंग लेख-

-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…

-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे

-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---