---Advertisement---

वयाच्या ३२ व्या वर्षी दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला ‘हा’ गोलंदाज

On: गुरूवार, जून 17, 2021 7:30 PM
---Advertisement---

कोरोनामुळे क्रिकेट इतक्या वेगाने सुरू नाही. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मुख्य प्रवाहापासून काहीसा दूर असलेल्या झिम्बाब्वे संघाला याच काळात एक धक्का बसला. अनुभवी वेगवान गोलंदाज कायले जार्विस यांनी सततच्या दुखापती व आजारांना कंटाळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. जार्विस केवळ ३२ वर्षाचा आहे. हा निर्णय घेणे आपल्यासाठी कठीण गेले असे जार्विसने कबूल केले.

झिम्बाब्वेसाठी ११ वर्ष खेळला आंतरराष्ट्रीय क्रिकेट
कायले जार्विस हा झिम्बाब्वेचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जात होता. २००९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर जार्विसने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकत कोलपॅक करार करून लँकेशायरसाठी काउंटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. मात्र, २०१७ मध्ये त्याने पुनरागमन केले होते. तेव्हापासून तो संघाचा नियमित सदस्य होता.

निवृत्तीचा निर्णय घेणे दुःखद
कायले जार्विसने निवृत्तीची घोषणा करताना म्हटले, “निवृत्ती घेणे माझ्यासाठी दुःखद निर्णय होता. आपल्या आवडीचे काम बंद करणे केव्हाही वाईट असते. मागील वर्षी पाठीच्या दुखापतीनंतर मी पुन्हा गोलंदाजी करेल की नाही, याबाबत साशंक होतो. मी त्या दुखापतीतून सावरलो. मात्र, भविष्यातील निर्णय घेणे माझ्यासाठी गरजेचे होते.”

जार्विसने मागील वर्षी श्रीलंकेविरुद्ध आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्याच कसोटी त्याला पाठीशी दुखापत झाली. दरम्यान त्याला कोरोना संसर्ग देखील झाला होता. यातून सावरल्यानंतर तो पुन्हा मलेरिया व हिवतापाने ग्रासलेला.

जार्विसची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या कायले जार्विसची ११ वर्षाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द दोन भागात विभागली गेली. त्याने या काळात झिम्बाब्वेसाठी १३ कसोटीत ४६, ४९ वनडेत ५८ तर २२ टी२० सामन्यात २८ बळी मिळवले. त्याने आपल्या ८४ प्रथमश्रेणी सामन्यांत ३२० बळी आपल्या नावे केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“धोनी माझ्यासाठी देवासमान, त्याच्याशी तुलना करू नका”

आयसीसीने केले विराटच्या एक्सप्रेशन्सचे फोटो शेअर; नेटकऱ्यांनी ट्विटरवर अशाप्रकारे उडवली थट्टा

सलग दोन विजयांसह युरो कप २०२० च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला इटली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---