झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला गुरुवारीपासून (१८ ऑगस्ट) ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेतील सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी होणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघात विद्यमान कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यादरम्यान झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू इनोसेंट काइया याने बुमराहच्या अनुपस्थितीचा संघाला फायदा होणार असल्याचे म्हटले आहे.
एका मुलाखतीत बोलताना झिम्बाब्वेचा खेळाडू काइया (Innocent Kaia) म्हणाला की, “जेव्हा विरोधी संघात बुमराह (Jasprit Bumrah) नसतो, तेव्हा नेहमीच एका संघासाठी फायद्याची गोष्ट ठरते. तो जगातील नंबर-१ गोलंदाजांपैकी एक आहे. अशात या मालिकेत त्याचा सामना करावा लागू नये, हे निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहे. तसेच झिम्बाब्वे दौऱ्यावर (India Tour Of Zimbabwe) येणाऱ्या भारतीय संघात ना विराट कोहली आहे, ना रोहित शर्मा आहे, ना रिषभ पंत आहे. यामुळे आमच्यासाठी गोष्टी सोप्या होणार आहेत.”
“परंतु मला माहिती आहे की, झिम्बाब्वेला येणारा भारतीय संघ एक मजबूत संघ आहे. त्यामुळे आम्ही त्यांना कमी लेखू शकत नाही. नक्कीच आमच्यापुढे एक तगडा संघ असणार आहे,” असेही काइयाने पुढे म्हटले.
असे आहेत दोन्हीही संघ-
भारत- केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल , आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाज अहमद.
झिम्बाब्वे: बर्ल रायन, रेजिस चकाब्वा (कर्णधार), चिवांगा तनाका, इवांस ब्रैडली, जोंगवे ल्यूक, काइया इनोसेंट, कैतानो ताकुदज़वानाशे, मदा क्लेंडेयव, मधेवरे वेस्ली, मारुमनी तादिवानाशे, विंगार टोनकार्ड, मारुमनी तादिवानाशे, मसारा तानाका, मारुमनी तदिवानाशे, विंगार जॉन, सिकंदर रझा, शुंबा मिल्टन, तिरिपानो डोनाल्ड
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी कोण आहे, त्याच्याशी माझी तुलना करणारा’, धोनीबद्दल केएल राहुलची हृदयास भिडणारी प्रतिक्रिया
झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडे ५ सलामीवीर, दोघांची जागा निश्चित; एकटा संपूर्ण मालिकेत बसणार बाहेर?
ZIMvsIND: राहुलने गाजवलेलं झिम्बाब्वेविरुद्धच पदार्पण, आता कॅप्टन म्हणून मिळवणार पहिला विजय?