मुंबई । कोविड -१९ साथीच्या रोगाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक द्विपक्षीय मालिका रद्द झाल्या आहेत, तर काही मालिका स्थगित करण्यात आल्या आहेत. आता झिम्बाब्वेने शनिवारी अफगाणिस्तानविरूद्ध आगामी पाच सामन्यांची टी -20 आंतरराष्ट्रीय मालिका रद्द केली.
ही टी -२० मालिका ऑगस्टमध्ये होणार होती. झिम्बाब्वे क्रिकेटने जैविक वातावरणात ही मालिका घेण्यास सरकारची परवानगी मागितली होती. पण कोविड -१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देश ही मालिका आयोजित करण्याच्या तयारीत नसल्याचे स्पोर्ट्स ऍण्ड रिक्रिएशन कमिशनने सांगितले.
झिम्बाब्वे क्रिकेटने ट्विट केले की, “झिम्बाब्वे क्रिकेटने ऑगस्टमध्ये हरारे येथे खेळवली जाणारी अफगाणिस्तान विरुद्ध पाच सामन्यांची टी -२० आंतरराष्ट्रीय मालिका रद्द केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही मालिका आयोजित करण्यासाठी देश तयार नाही.”
@ZimCricketv has called off the five-match T20I series against @ACBofficials scheduled to be played in Harare this August after the Government advised the country was not ready as yet to host visiting teams amid a spike in the number of COVID-19 cases #ZIMvAFG | #BowlOutCovid19 pic.twitter.com/wXga8QXh1m
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) August 8, 2020
ऑगस्टमध्ये भारताला झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिकादेखील खेळायची होती, पण ही मालिका देखील कोविड -१९ मध्येही सापडली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ऑगस्टमध्ये झिम्बाब्वेसमवेत तीन वनडे सामन्यांची मालिकादेखील रद्द केली आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियामध्ये खेळली जाणार होती.
महत्त्वाच्या बातम्या –
गांगुलीच्या निवृत्तीनंतर युवराजला कसोटीत मिळाली होती संधी पण यामुळे संपली कसोटी कारकीर्द
युजवेंद्र चहलचा झाला साखरपूडा! सोशल मीडियावर शेअर केले फोटो
ट्रेंडिंग लेख –
कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये ‘या’ ५ खेळाडूंनी केल्यात सर्वाधिक धावा; गेलच्या आसपासही नाही कुणी
आयपीएल २०२०: युएईच्या मैदानावर ‘हे’ ५ स्पिनर दाखवू शकतात कमाल, ३ भारतीयांचा समावेश






