ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे संघात शुक्रवारी (02 सप्टेंबर) टाउन्सविले येथे तिसरा व अखेरचा वनडे सामना झाला. या सामन्यात झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी विलक्षण खेळ दाखवत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 3 विकेट्सने पराभूत केले. झिम्बाब्वेसाठी सर्वार्थाने हा विजय खास राहिला. हा त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियातील पहिलावहिला वनडे विजय होता. तसेच झिम्बाब्वे संघाने हा विजय मिळवत असे काही करून दाखवले आहे, जे पाकिस्तान संघालाही जमले नाही.
खरे तर, झिम्बाब्वे संघाचा (Zimbabwe vs Austalia) हा गेल्या 15 वर्षांतील ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला पहिला विजय होता. विशेष म्हणजे, त्यांनी हा पराक्रम करायला पाकिस्तानपेक्षा जवळपास तिप्पट सामने कमी घेतले आहेत.
झिम्बाब्वेने गेल्या 15 वर्षांत ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त 3 वनडे सामने खेळले आहेत. या तीनपैकी आता टाउन्सविले येथे झालेला सामना जिंकत झिम्बाब्वेने विजयश्री मिळवली आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघाची गेल्या 15 वर्षांतील कामगिरी पाहायची झाल्यास, त्यांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 वनडे सामने खेळले आहेत. या 11 पैकी त्यांना फक्त एक सामना जिंकता आला आहे.
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन वनडे जिंकत आधीच 3 सामन्यांची वनडे मालिका नावावर केली होती. मात्र तिसरा वनडे सामनाही जिंकत त्यांच्याकडे झिम्बाब्वेला व्हाईटवॉश देण्याची संधी होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 31 षटकात 141 धावांवरच गुंडाळला. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांपुढे एकट्या डेविड वॉर्नरला वगळता कोणाचाही टिकाव लागला नाही. वॉर्नरने 94 धावा केल्या. तर इतर सर्व फलंदाज 47 धावांवरच बाद झाले. या डावात झिम्बाब्वेकडून रयाल बर्लने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने 39 षटकात 7 विकेट्सच्या नुकसानावर ऑस्ट्रेलियाचे लक्ष्य पूर्ण केले. सलामीवीर मरुमनी आणि कर्णधार रेगिस चकाब्वा यांनी चिवट झुंज दिल्या. चकाब्वाने डावाखेर नाबाद 37 धावा केल्या. तसेच मरुमनीने 35 धावा जोडल्या आणि संघाला वनडे मालिकेचा विजयी शेवट करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
विरुष्काचा फोटो वॉर्नरची कमेंट आणि ट्रोलिंग नंतरचं स्पष्टीकरण! वाचा काय आहे प्रकरण
फखरचा कहर! पूर्ण ताकदनिशी मारला शॉट आणि चेंडू थेट स्टेडियमबाहेर, पाहा सिक्स
‘बाबर आझमच क्रिकेटचा खरा किंग!’ हाँगकाँगच्या कर्णधाराने केलेल्या ट्वीटमागील सत्य समोर