स्वीडनचा माजी दिग्गज फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविचने मेजर लीग सॉकरमधील एलए गॅलक्सीकडून खेळताना त्याच्या कारकीर्दीतील ५००वा गोल केला आहे.
गॅलक्सी या सामन्यात ०-३ असा मागे होता यावेळी झ्लाटनने ४३व्या मिनिटाला तायक्वोंदो स्टाईलने गोल करत क्लबचे खाते उघडले. त्यानंतर ओला कॅमरा आणि रोल्फ फ्लेस्चर यांनी प्रत्येकी एक गोल करत सामना ३-३ असा बरोबरीत आणला होता. मात्र यावेळी गॅलक्सीला टोरंटो क्लबकडून ३-५ असा पराभवाचा सामना करावा लागला.
Zlatan's 500th career goal is RIDICULOUS. 🔥#TORvLA #Zlatan500 https://t.co/gosg571udB
— Major League Soccer (@MLS) September 16, 2018
माजी मॅंचेस्टर युनायटेडचा स्ट्रायकर झ्लाटन सध्या खेळत असलेल्यांपैकी क्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनल मेस्सी नंतर फक्त तिसराच फुटबॉलपटू आहे ज्याने त्याच्या कारकिर्दीचे ५०० गोल पुर्ण केले आहेत. यामध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय आणि क्लब्सच्या गोलचा समावेश आहे.
Cristiano Ronaldo.
Lionel Messi.
Zlatan Ibrahimović. @Ibra_official joins elite company as the third active player to score 500 career goals across his senior career between club and country. pic.twitter.com/umjiTefx4N
— LA Galaxy (@LAGalaxy) September 16, 2018
३६ वर्षीय झ्लाटनने १५६ गोल पॅरीस सेंट-जर्मनकडून, ६६ गोल इंटर मिलान, ५६ गोल एसी मिलान, ४८ गोल अजॅक्स, २९ गोल युनायटेड, २६ गोल जुवेंटस, २२ बार्सिलोना आणि १८ गोल मॅलमोकडून केले आहेत.
स्वीडनच्या फुटबॉल इतिहासात आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करण्यात इब्राहिमोविच पहिल्या स्थानावर आहे. त्याने ११६ सामन्यात ६२ गोल केले आहेत.
झ्लाटनने २०१८च्या सुरूवातीलाच युनायटेड सोडून गॅलक्सीकडे गेला. या क्लबकडून खेळताना त्याने २२ सामन्यात १७ गोल केले आहेत.
500 pic.twitter.com/EObuJwoaMA
— Zlatan Ibrahimović (@Ibra_official) September 16, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहलीला वगळणे कितपत योग्य? माजी निवड समिती सदस्याचा सवाल
–प्रीमियर लीग: लीव्हरपूलची विजयी घोडदौड सुरूच
–SAFF Cup Final: भारताला पराभूत करत मालदीवने जिंकला सॅफ कप