टी-20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. इंग्लंडने हा अंतिम सामना 5 विकेट्स राखून जिंकला आणि इतिहासात दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचा विजेता संघ बनला. पाकिस्तान मात्र 1992 च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती करू शकला नाही. पाकिस्तानची फलंदाजी या सामन्यात खूपच संथ पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर त्यांचा एक माजी दिग्गज क्रिकेटपटू सलामीवीर आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिजवानवर चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले.
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) 14 चेंडू खेळला आणि यामध्ये त्याने अवघ्या 15 धावा केल्या. रिझवानसोबत सलामीसाठी आलेला कर्णधार बाबर आझम (Babar Azam) देखील अवघ्या 32 धावा करून तंबूत परतला. परिणामी पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना अपेक्षित धावसंख्या करता आली नाही. प्रत्युत्तरात इंग्लंडने पाकिस्तानकडून मिळालेले लक्ष्य एक षटक शिल्लक असताना गाठले आणि सामना नावावर केला. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू संघाच्या या सुमार प्रदर्शनावर निशाणा साधताना दिसत आहेत. अशातच त्यांचे माजी यष्टीरक्षक फलंदाज जुल्करनैन हैदर (Zulqarnain Haider) यांनी मोहम्मद रिझवानला धारेवर धरले आहे.
मोहम्मद रिजवान नेहमीच खेळपट्वीवर आल्यानंतर नमाज पढण करकताना दिसतो. जुल्करनैन हैदर यांनी अगदी हाच मुद्दा धरून रिझवानवर टीका केली आहे. जुल्करनैन एका टीव्ही चॅनलवर बोलताना म्हणाले की, “जर तुम्ही नमाज पठण केलेच होते, तर सामना का जिंकला नाही. कुणी शुन्यावर बाद झाले, तर कुणी 15 धावांवर बाद झाले. नमाज पठम तुम्हाला स्वतःसाठी करायचे आहे, देवाची प्रार्थना करण्यासाठी तुम्ही ही गोष्ट करता. एखाद्या थर्मासाठी तुम्हाला ही गोष्ट करायची नाहीये आणि दिखावा करण्यासठीही नाही. कुठे गेली तुमची नमाज, अंतिम सामन्यात पाकिस्तान जिंकला नाही.”
What a disgusting person he is. Shame on you Zulqarnain Haider 😡 pic.twitter.com/4btHafLjB0
— Thakur (@hassam_sajjad) November 14, 2022
“इंग्लंडचे दोन खेळाडू तुमच्यापेक्षा चांगले मुस्लीम आहेत. ते तुमच्यासारखा दिखावा करत नाहीत. इंग्लंडचे हे दोन्ही मुस्लीम खेळाडू आदिल राशीद आणि मोईन अली तुमच्यासारखं मैदानात नमाज पठण करत नाहीत. नमाज पठण तुम्हाला स्वतःसाठी करायचे असते. तुम्ही जिम्बाब्वेकडून का पराभूत झालात. तुम्ही इश्वराचे आभार मानले पाहिजे की, अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलात,” असेही जुल्करनैन पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, टी-20 विश्वचषकात पाकिस्तानेच एकंदरीत प्रदर्शन पाहता ते कसेबसे उपांत्य फेरीत पोहोचले होते. पाकिस्तानने उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला मात दिली आणि अंतिम सामन्यातही जागा पक्की केली. अंतिम सामन्यात मात्र नशीब त्याच्यासोबत नव्हते. इंग्लंडविरुद्ध खेळताना पाकिस्तान अवघ्या 137 धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने मात्र हे लक्ष्य सहज गाठले. (Zulqarnain Haider on Mohammad Rizwan says you are not a true muslim )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मायकल वॉन विरुद्ध भारतीय संघ! हार्दिक पंड्याचे माजी इंग्लिश कर्णधाराला प्रत्युत्तर
रोहित-राहुलच्या अनुपस्थितीत कोण करणार ओपनिंग? पर्यायांनी वाढली कॅप्टन हार्दिकची डोकेदुखी