इंंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल 2023 मध्ये रिटेन करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची शेवटची वेळ दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच गतविजेत्या गुजरात टायटन्सने दोन खेळाडू रविवारी (13 नोव्हेंबर) ट्रेड केले आहेत. त्यांनी लॉकी फर्ग्युसन आणि रहमनुल्लाह गुरबाझ यांना कोलकाता नाईट रायडर्सला दिले आहे. तर झालेल्या पहिल्या विंडोमध्ये मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या जेसन बेहरेनडॉर्फ याला संघात घेतले.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) याला आगामी आयपीएल 2023च्या हंगामासाठी गुजरात टायटन्सकडून कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील करण्यात आले आहे. त्याने गुजरात टायटन्ससाठी 13 सामने खेळले आणि 12 बळी घेतले, त्यामध्ये एका सामन्यात 4 विकेट्स घेण्याची कामगिरीही आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सकडून अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज रहमनुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) यालाही विकले आहे. 2022 च्या TATA IPL आवृत्तीत त्याला गुजरात टायटन्स संघात इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉय याचा बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता परंतु गेल्या मोसमात त्याने कोणताही खेळ खेळला नाही.
आयपीएल 2022च्या मेगा लिलावात फर्ग्युसनला टायटन्सने 10 कोटी रुपयांना विकत घेतले होते. फर्ग्युसन हा हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखालील संघासाठी मोहम्मद शमीसह प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. फर्ग्युसन 2019-21 पासून नाईट रायडर्ससोबत होता.
दुसरीकडे, वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमधून माघार घेतलेल्या इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयच्या जागी गुरबाजला संघात स्थान देण्यात आले. गुरबाजने टायटन्ससाठी एकही सामना खेळला नाही पण अलीकडेच आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानसाठी खेळताना त्याने पहिल्या सहा षटकांमध्ये बॅटने किती स्फोटक आणि धोकादायक असू शकतो हे दाखवून दिले आहे.
फर्ग्युसनला ट्रेड केल्यानंतर गुजरात टायटन्सकडे 10 कोटी आले असून, लिलावापूर्वी त्यांच्यासाठी ही चांगली डील ठरली.
🚨 NEWS 🚨: Lockie Ferguson and Rahmanullah Gurbaz traded from Gujarat Titans to Kolkata Knight Riders. #TATAIPL
More Details 👇https://t.co/FwBbZbwcP9
— IndianPremierLeague (@IPL) November 13, 2022
पहिला ट्रेड झाला असून, मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या जेसन बेहरेनडॉर्फ याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. या ट्रेडिंग विंडोद्वारे सर्व संघ इतर संघाकडून लिलावाव्यतिरिक्त खेळाडू परस्पर संमतीने आपल्याकडे घेऊ शकतात. या पहिल्या ट्रेडिंग विंडोचा कालावधी 15 नोव्हेंबर पर्यंत असेल. 15 नोव्हेंबर रोजी सर्व संघांना आपण रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे. तत्पूर्वी या हंगामाच्या पहिल्या ट्रेडची घोषणा झाली. Gujarat’s Lockie Ferguson & Rahmanullah Gurbaz join KKR for 2023 IPL
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20मध्ये बाबर आझम इंग्लंडचा कर्दनकाळ! आकडे पाहून विरोधी संघाला धक्का बसेल
T20WC: फायनलमध्ये टीम इंडिया नाही पण इंडियन तडका! एमसीजीमध्ये 13 वर्षीय भारतीय मुलीचा जलवा