भारतीय संघ जून महिना अखेरीस आयर्लंडला २ टी२० सामने खेळण्यासाठी जाणार आहे. भारत २६ आणि २८ जुन रोजी हे दोन टी२० सामने खेळणार आहे. तर या २ टी२० सामन्याच्या मालिकेसाठी भारताचा अष्टपैलु खेळाडु हार्दिक पंड्या याला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली आहे. ही बातमी येताच, आयपीएल २०२२च्या विजेत्या संघाकडुन खेळणाऱ्या युवा वेगवान गोलंदाज यश दयालने हार्दिक पंड्याला कर्णधारपद मिळण्यावर आपले मत व्यक्त केले आहे.
एका संकेतस्थळासोबत बोलत असताना युवा वेगवान गोलंदाज यश दयाल म्हणाला की,”हार्दिक पंड्या हा एक आत्मविश्वासाने भरलेला खेळाडू आणि कर्णधार आहे. तसेच तो फार शांतही आहे. त्याला खेळाची खुप छान जाण आहे. त्याला माहित आहे की, सामन्यात कोणत्या वेळी काय करायचे आहे. तो गोलंदाजांना आवडेल असा कर्णधार आहे. जर तुमच्यात आत्मविश्वास आहे तर तो तुमचे निर्णय तुम्हाला घेऊ देतो. मी म्हणेल की, मी आतापर्यंत जेवढ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे त्याच्यातील हार्दिक हा सर्वाश्रेष्ठ कर्णधार आहे”.
आयपीएल २०२२ सुरु होण्यापुर्वी हार्दिक पंड्याचा फॉर्मही खराब होता तसेच त्याआधी दुखापतींशी सोबतही झुंझत होता. तसेच गोलंदाजी देखील करत नव्हता. आणि त्याचबरोबर याआधी कधीच कर्णधारपद न भुषवलेल्या हार्दिक पंड्याच्या आयपीएल २०२२ मध्ये खेळण्यावर आणि कर्णधार म्हणुन त्याचे संघाचे नेतृत्व कसे असणार यावर प्रश्नचिन्हे होते. मात्र हार्दिक पंड्याने केवळ गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व नाही केले तर पहिल्यांदाच कर्णधार म्हणुन नेतृत्व करताना त्याने आपल्या संघाला आयपीएल २०२२चा विजयी संघ देखील बनवले. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये २०२२च्या मेगा लिलावानंतर गुजरात टायटन्सला आयपीएल २०२२चा सर्वात कमजोर संघ म्हणले जात होते. मात्र हार्दिकने प्रशिक्षक आशिष नेहरासोबत मिळुन प्रत्येक खेळाडुचे चांगले प्रदर्शन काढण्यात यशस्वी ठरले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकेकाळीची ताकदच आता टीम इंडियाची बनली डोकेदुखी!
कशी नशीबानं थट्टा आज मांडली! आयर्लंड दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी ‘या’ पाच खेळाडूंना केले दुर्लक्षित
दुखापत की अजून काही? भारताच्या पहिल्या तुकडीसह रोहित का गेला नाही इंग्लंडला? घ्या जाणून