नंदुरबार हिमालयन ताहर्स विरुद्ध सांगली सिंध सोनिक्स यांच्यात दुसरी लढत झाली. दोन्ही संघानी एक सामना जिंकला होता तर एक सामना गमावला होता. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. तेजस काळभोरच्या चतुरस्त्र चढायानी सांगली संघावर लोन पाडला. वृषभ साळुंखेच्या अष्टपैलू खेळीने सांगली संघाने आपली पिझाडी कमी केली.
मध्यांतराला 19-15 अशी आघाडी नंदुरबार संघाकडे होती. तेजस काळभोर च्या सुपर टेन पूर्ण केला. मध्यांतरांतर सामना चुरशीचा झाला. तेजस काळभोर, अभिजित गायकवाड यांच्या आक्रमक चढायानी नंदुरबार संघाने सामना एकतर्फी केला. नंदुरबार संघाने 39-32 असा सांगली संघाला नमवत दुसरा विजय मिळवला. नंदुरबार कडून तेजस काळभोर ने 10 गुण मिळवले तर अभिजित गायकवाड ने 7 गुण मिळवले. तर तेजस राऊत ने 4 तर पार्थ पैठणपगारे ने 3 पकडी करत महत्वाची भूमिका निभावली. तर सांगली कडून वृषभ साळुंखे व तुषार खाडाखे ने चढाईत प्रत्येकी 8 गुण मिळवले. (Second win for Nandurbar Himalayan Tahrers in the relegation round)
बेस्ट रेडर- तेजस काळभोर, नंदुरबार हिमालयन ताहर्स
बेस्ट डिफेंडर्स- तेजस राऊत, नंदुरबार हिमालयन ताहर्स
कबड्डी का कमाल- अभिजित} गायकवाड, नंदुरबार हिमालयन ताहर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अनुज रावतचा सुपर थ्रो! पृथ्वी शॉ आयपीएल हंगामातील सलग पाचव्या सामन्यात अपयशी
परभणी पांचाला प्राईड संघाची धुळे चोला वीरांस वर मात