---Advertisement---

‘शतकवीर’ रोहित शर्मा ‘रनमशीन’ विराट कोहलीला याबाबतीत ठरला वरचढ!

On: बुधवार, डिसेंबर 18, 2019 5:48 PM
---Advertisement---

विशाखापट्टणम। आज(18 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात दुसरा वनडे सामना होत आहे. या सामन्यात रोहित शर्माने(Rohit Sharma) 138 चेंडूत 17 चौकार आणि 5 षटकारांसह 159 धावा केल्या.

रोहितचे हे जानेवारी 2017 पासूनचे 18 वे वनडे शतक आहे. त्यामुळे तो जानेवारी 2017पासून वनडेत सर्वाधिक शतके करणारा(Most ODI 100s since the start of 2017) फलंदाज ठरला आहे. त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीला(Virat Kohli) मागे टाकले आहे.

विराटने जानेवारी 2017 पासून वनडेत 17 शतके केली आहेत. विशेष म्हणजे या दरम्यान रोहित आणि विराट व्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला 10 पेक्षा अधिक वनडे शतके करता आलेले नाहीत.

जानेवारी 2017 पासून सर्वाधिक वनडे शतके करणारे क्रिकेटपटू –

18 – रोहित शर्मा

17 – विराट कोहली

9 – जॉनी बेअरस्टो

8 – शिखर धवन, बाबर आझम, ऍरॉन फिंच, जो रुट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---