नागपूर: मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या नागपूर टप्प्यात शुक्रवारी अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. पण, पोदार इंटरनॅशनल स्कूल संघाच्या शिवम जोशीच्या नावावर आजचा दिवस राहिला. त्याने ९ विकेट्स घेत संघाच्या विजयाचा मार्ग सुलभ केला.
१६ वर्षांखालील मुले गटात पोदार इंटरनॅशनल स्कूल संघाने दहा विकेट्स राखून प्रेरणा पब्लिक स्कूलवर सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरणाऱ्या प्रेरणा पब्लिक स्कूलचा संपूर्ण संघ ६.३ षटकांत ३७ धावांत माघारी परतला. शिवम जोशीने ९ विकेट्स घेतल्या. पोदार इंटरनॅशनल स्कूलसंघाने हे लक्ष्य ३.२ षटकांत एकही गडी न गमावता पार केले. पलाश कानोजेने नाबाद १९, तर अनुराग दीक्षितने नाबाद १३ धावा केल्या.
सेंटर पॉईंट स्कूल आणि एमकेएच संचेती पब्लिक स्कूल यांच्या सामन्यात धावांचा पाऊस पडला. प्रथम फलंदाजी करताना सेंटर पॉईंट स्कूल ( काटोल रोड) संघाने ४० षटकांत ५ बाद ५१४ धावा केल्या. प्रथम महेश्वरीने ४० चेंडूंत ११४ धावा केल्या. हर्ष गजभियेनेही १३२ धावांची खेळी साकारली. लक्ष्याचा पाठलाग करताना एमकेएच संचेती पब्लिक स्कूल संघ १६.४ षटकांत ११५ धावांवर गडगडला. प्रथमने गोलंदाजीतही ३ विकेट्स घेतल्या. सेंटर पॉईंट संघाने ३९९ धावांनी हा सामना जिंकला.
१४ वर्षांखालील मुले गटात सार्थक मगर आणि इशान खोडके यांनी आपापल्या संघासाठी अष्टपैलू कामगिरी केली. दी साऊथ पब्लिक स्कूल संघाने पीयूष ठाकरे ( ८७*) आणि सार्थक मगर ( ६३) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ६ बाद ३९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात एमकेएच संचेती पब्लिक स्कूल संघाला ११.२ षटकांत ९ बाद ७० धावा करता आल्या. सार्थक मगर ३४ चेंडूंत ६३ धावांसह ३ विकेट्ही घेत अष्टपैलू कामगिरी केली.
दी स्वामीनारायण स्कूल संघाच्या विजयात इशान खोडकेची अष्टपैलू कामगिरी महत्त्वाची ठरली. इशानने नाबाद ९१ धावा केल्या आणि दोन विकेट्स घेत संघाला के. जॉन पब्लिक स्कूल संघावर विजय मिळवून दिला. दी स्वामीनारायण स्कूल संघाने ५ बाद २३९ धावा केल्या. प्रत्युत्तरात के. जॉन पब्लिक स्कूल संघाचे सर्व फलंदाज १९ षटकांत ८० धावांवर तंबूत परतले.
संक्षिप्त धावफलक
१६ वर्षांखालील मुले
पोदार इंटरनॅशनल स्कूल ३.२ षटकांत बिनबाद ३८ ( पलाश कानोजे १९*, अनुराग दीक्षित १३*) वि. वि. प्रेरणा पब्लिक स्कूल ६.३ षटकांत सर्वबाद ३७; सामनावीर – शिवम जोशी ( ९ विकेट्स)
सेंटर पॉईंट स्कूल ( काटोल रोड) ४० षटकांत ५ बाद ५१४ ( हर्ष गजभिये १३२, प्रथम महेश्वरी ११४) वि. वि. एमकेएच संचेती पब्लिक स्कूल १६.४ षटकांत सर्वबाद ११५; सामनावीर – प्रथम महेश्वरी ( ४० चेंडूंत ११४ धावा आणि ३ विकेट्स)
सेंटर पॉईंट स्कूल ( वर्धमान नगर) ६ बाद १९५ ( कृष्णा केला ५९*, चिन्मय निंबाळकर ५३) वि. वि. दी स्वामीनारायण स्कूल ३०.५ षटकांत सर्वबाद १५०; सामनावीर – चिन्मय निंबाळकर ( ५३ धावा आणि ४ विकेट्स)
१४ वर्षांखालील मुले
स्कूल ऑफ स्कॉलर्स १८.५ षटकांत ६ बाद १२८ ( प्रसाद कवाडकर ४१, पीयूष तिवारी १७) वि. वि. श्री कॉन्व्हेंट ॲन्ड हायस्कूल ३०.१ षटकांत सर्वबाद १२७; सामनावीर – प्रसाद कवाडकर ( ३९ चेंडूंत ४१ धावा आणि ३ विकेट्स)
दी साऊथ पब्लिक स्कूल ६ बाद ३९२ ( पीयूष ठाकरे ८७*, सार्थक मगर ६३) वि. वि. एमकेएच संचेती पब्लिक स्कूल ११.२ षटकांत ९ बाद ७०; सामनावीर – सार्थक मगर ( ३४ चेंडूंत ६३ धावा आणि ३ विकेट्स)
दी स्वामीनारायण स्कूल ५ बाद २३९ ( इशान खोडके ९१*, मोहीत बोरकर ५१) वि. वि. के. जॉन पब्लिक स्कूल १९ षटकांत सर्वबाद ८०; सामनावीर – इशान खोडके ( नाबाद ९१ धावा आणि २ विकेट्स)
संदीपानी स्कूल ( हझरीपहाड ) ८ बाद ३०० ( सचिन पाल १०१, देव निगम ७२) वि. वि. कर्वे न्यू मॉडेल पब्लिक स्कूल २८.२ षटकांत सर्वबाद १०४; सामनावीर – सचिन पाल ( ७५ चेंडूंत १०१ धावा आणि १ विकेट्स)
१६ वर्षांखालील मुली
श्री राजेंद्र हायस्कूल ४ षटकांत १ बाद २५ ( वैदेही पांढरे ७*, अक्षता इटानकर ३*) वि. वि. सोमलवार हायस्कूल ( मौमिया) ८.१ षटकांत सर्वबाद २४; सर्वोत्तम खेळाडू – कशीष आगरे ( ४ विकेट्स)
दी साऊथ पब्लिक स्कूल २३.४ षटकांत सर्वबाद १३७( शरयू शेंद्रे २९, भार्गवी असोळे २२) वि. वि. सिद्धेश्वर विद्यालय २२.२ षटकांत सर्वबाद ८४; सर्वोत्तम खेळाडू – आर्या पौलकर ( ३ विकेट्स आणि २ निर्धाव षटके)