---Advertisement---

मँचेस्टर युनायटेडमध्ये खळबळ! एकाच वेळी तब्बल १७ प्रमुख खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत

On: शुक्रवार, जानेवारी 7, 2022 3:32 PM
man-u
---Advertisement---

इंग्लंडमधील प्रतिष्ठित फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडसाठी (Manchester United) सध्या काहीही योग्य होत नाही. अलीकडेच वॉल्व्हरहॅम्प्टनने त्यांना घरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पराभूत केले. पराभवानंतर या मैदानावरील त्यांचा विजयरथ थांबला. आता ब्रिटीश मीडियामध्ये बातम्या येत आहेत की या क्लबचे १७ प्रमुख खेळाडू त्यांच्या संघ व्यवस्थापनावर नाराज आहेत आणि ते क्लब सोडू शकतात. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) या संघाचा भाग आहे.

संघात माजली दुफळी
एका अहवालानुसार, मँचेस्टर युनायटेडमध्ये काहीही बरोबर नाही आणि खेळाडू विभागले गेले आहेत. ते क्लबवर खूश नाहीत. इंग्रजी वृत्तपत्र डेली मेलच्या वृत्तानुसार, १७ प्रमुख खेळाडू पुढील हंगामापूर्वी क्लब सोडू शकतात. ड्रेसिंग रूममध्ये सध्या वातावरण बिघडले आहे.

हे खेळाडू सोडू शकतात क्लब
अहवालानुसार पॉल पोग्बा, जेसी लिंगार्ड, अँथनी मार्शल, एडिन्सन कवानी, डॉनी व्हॅन डी बीक, डीन हेंडरसन, एरिक बेली यांच्यासह अनेक स्टार खेळाडू क्लब सोडण्याच्या तयार आहेत. त्यांना दुसऱ्या संघांकडून ऑफर आल्या आहेत. तसेच, संघाचे मनोबलही सध्या कमी आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की, संघाचे अंतरिम बॉस राल्फ रॅगनिक संघाला एकत्र आणण्याचे काम करत आहेत. परंतु, ते तसे करण्यास असमर्थ ठरत आहेत.

डॉनी व्हॅन डी बीक, हेंडरसन आणि एरिक बेली त्यांना मैदानावर जास्त वेळ न दिल्याने आणि ताबडतोब त्यांना बदली केल्याबद्दल संतापले आहेत. पोग्बा आणि लिंगार्ड यांनी कराराचे नूतनीकरण करण्यात रस दाखवला नाही. त्याचवेळी, ट्रान्सफर विंडो उघडताच कवानी आणि जुआन माटा फ्री एजंट बनतील. फिल जोन्स बेनफिका संघात सामील होऊ शकतो. त्याचवेळी नेमांजा मॅटिच, फ्रेड आणि डिओगो दलोत यांच्या कराराचे हे शेवटचे वर्ष आहे.

गुणतालिकेत खाली आहे संघ
इंग्लिश प्रीमियर लीगबद्दल बोलायचे तर क्लबने या हंगामात १९ सामन्यांत ३१ गुण मिळवले आहेत. त्यांनी फक्त नऊ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी चार सामने अनिर्णित राहिले आणि सहामध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. संघ सध्या प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. संघ आपला पुढील सामना 10 जानेवारीला ऍस्टन व्हिलाविरुद्ध खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सूर्यकुमार यादवच्या पोस्टवर पतीसाठी रितिकाची हटके कमेंट; म्हणाली, ‘रोहितला माझ्याकडून…’ (mahasports.in)

“हार्दिक पंड्याकडून ज्या अपेक्षा करत होतो, त्या शार्दुल ठाकूर पूर्ण करत आहे” (mahasports.in)

टी२० क्रिकेटमध्ये आयसीसीने लागू केला नवा नियम, गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक चूक पडणार महागात (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---