कोरोना व्हायरसमुळे सर्व काही ठप्प झाले आहे. या व्हायरसमुळे क्रीडा जगतालाही फटका बसला आहे. अनेक स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. अशामध्येच आता भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी टी२० लीग असणाऱ्या आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जर आयपीएल २०२० (IPL2020) च्या १३ व्या हंगामाचे (13th Season) आयोजन झाले नाही तर या हंगामात खेळणाऱ्या खेळाडूंना त्यांचा पगार मिळणार नाही, अशी माहिती आयपीएल फ्रंचायझीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
जर आयपीएलचे आयोजन झाले नाही तर आयपीएलमध्ये खेळणारे विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इतर १८९ खेळाडूंना त्यांचा पगार (Payment) मिळणार नाही.
यावेळी आयपीएल फ्रंचायझीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “आयपीएल सुरु होण्याच्या एका आठवड्यापूर्वी खेळाडूंना १५ टक्के रक्कम दिली जाते. आयपीएलदरम्यान ६५ टक्के रक्कम दिली जाते. त्यानंतर उर्वरित २० टक्के रक्कम आयपीएल संपल्यानंतर निर्धारित वेळेच्या आत दिली जाते. अशाप्रकारे आयपीएलच्या पगाराचे वाटप केले जाते. बीसीसीआयकडे विशेष मार्गदर्शक तत्त्वे आहेत. नक्कीच अद्याप कोणत्याही खेळाडूला काहीही दिले गेले नाही.”
भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा (Ashok Malhotra) यांनी सांगितले की, “आयपीएलचे एक सत्र रद्द झाले तर आर्थिक नुकसान खूप होईल. जर आयपीएलच झाले नाही तर हजारो करोडो रुपयांचे नुकसान होईल. त्यामुळे देशांतर्गत खेळाडूंचेही नुकसान होईल.”
आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, “साथीच्या आजारांसाठी खेळाडूंच्या पगाराचा विमा काढला जात नाही. आम्हाला विमा कंपनीकडून कोणतीही रक्कम मिळणार नाही. कारण, हा व्हायरसचा विम्याच्या अटींमध्ये समावेश नाही. प्रत्येक फ्रंचायझी पगाराची रक्कम ७५ ते ८५ कोटी रुपये आहे. त्यामुळे जर स्पर्धाच होणार नसेल तर आम्ही खेळाडूंचा पगार कसा देऊ शकतो.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-सर्वाधिक वनडे सामन्यात पराभव पाहणारे ५ क्रिकेटर
-सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे जगातील २ दिग्गज, एक आहे भारतीय
-मला जसा पाठिंबा गांगुलीने दिला तसा पाठिंबा धोनी-विराटने दिला नाही- युवराज