२१व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे लोकांच्या जीवनाला खूप वेग आला आहे. त्यामुळे अधिकतर लोकांना पटकन होणाऱ्या गोष्टींमध्ये जास्त रस असतो. अगदी क्रिकेटच्या बाबतीतही अनेकांच असच आहे. त्यामुळे लोकांना क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांतील सर्वात छोटा प्रकार म्हणजे टी२० क्रिकेट पाहायला जास्त आवडते.
आपणा सर्वांना माहित आहे की, क्रिकेट सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या कामगिरीला मोठे महत्त्व असते. त्याची कामगिरी सामनावीर पुरस्कार देताना लक्षात घेतली जात असते. साधारण जो खेळाडू त्याच्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतो, त्याला हा पुरस्कार दिला जातो.
२० षटकांच्या टी२० क्रिकेटमध्ये खेळाडूंना मिळालेल्या वेळेत चांगली कामगिरी करुन दाखवण्याचा दबाव असतो. अशा वेळी महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार मिळतो. टी२० क्रिकेटच्या इतिहासात आजवर अनेक खेळाडूंनी हा पुरस्कार मिळवला आहे. शाहिद आफ्रिदी, ख्रिस गेल, शेन वॉटसन या परदेशी खेळाडूंनी त्यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर टी२० क्रिकेटमध्ये अनेकदा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. याबाबतीत भारतीय खेळाडूही मागे नाहीत.
या लेखात, आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या २ भारतीय खेळाडूंविषयी माहिती देण्यात आली आहे. तर बघा, कोणत्या भारतीय खेळाडूंचा या यादीत समावेश आहे?
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले २ भारतीय खेळाडू (2 Indian Players Who Win Most Times Man Of The Match Award In T20 Cricket) –
२. रोहित शर्मा – १० वेळा सामनावीर पुरस्कार
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणला जाणारा भारतीय खेळाडू म्हणजे रोहित शर्मा. ‘हिटमॅन’ रोहितने आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाला कित्येक सामने जिंकून दिले आहेत.
रोहितने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत १०८ टी२० सामने खेळले आहेत. दरम्यान १३८.७८च्या स्ट्राईक रेटने त्याने २७७३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४ शतकांचा समावेश आहे. रोहितला त्याच्या टी२० सामन्यांतील दमदार प्रदर्शनासाठी आतापर्यंत १० वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. भारतीय टी२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवणारा तो दूसरा फलंदाज आहे.
१. विराट कोहली – १२ वेळा सामनावीर पुरस्कार
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याचे गेल्या काही वर्षातील कसोटी, वनडे आणि टी२० क्रिकेटमधील प्रदर्शन दमदार राहिले आहे. त्याने आतापर्यंत ८२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ५०.८०च्या सरासरीने २७९४ धावा केल्या आहेत.
विराटच्या नावावर टी२० क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांची नोंद आहे. यामध्ये टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा सामनावीर पुरस्कार मिळवण्याच्या विक्रमाचीही नोंद आहे. त्याने आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये १२वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. विराट हा भारतीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा सामनावीर पुरस्कार मिळवणारा अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे.
तर जगातील सर्वाधिकवेळा सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दूसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अफघानिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद नबी हा विराजमान आहे.
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष : विराट नसता तर बद्रीनाथ असता
या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार
एका आयपीएल हंगामात तब्बल १००० मिनीटं फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल ५ महिन्यांनतर मैदानात उतरल्याबद्दल कॅप्टन कोहली म्हणतो, असे वाटते की…
वेगवान गोलंदाज दीपक चहराला कोरोनाची लागण? बहिण मालतीने दिली अशी प्रतिक्रिया
राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकांनी केली कोरोनावर मात; दुबईमध्ये झाले दाखल