---Advertisement---

असं टायमिंग भल्या भल्यांना जमलं नाही, रोहितचा नादच खुळा

On: बुधवार, ऑक्टोबर 2, 2019 2:29 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात आजपासून(2 ऑक्टोबर) विशाखापट्टणमला पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे. त्याने 153 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने त्याचे कसोटीतील चौथे शतक पूर्ण केले आहे.

रोहित आज पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करत आहे. त्यामुळे कसोटी सलामीवीर म्हणून त्याचे हे पहिलेच शतक ठरले आहे. या शतकाबरोबरच रोहितच्या बाबतीत एक खास योगायोग झाला आहे.

रोहितने बरोबर 4 वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबर 2015 ला आंतरराष्ट्रीय टी20मधील सलामीवीर म्हणून पहिले शतक केले होते. विशेष म्हणजे हे शतकही त्याने दक्षिण आफ्रिके विरुद्धच केले होते. या सामन्यानंतर त्याने 4 वर्षांनंतर आज (2 ऑक्टोबर) कसोटी सलामीवीर म्हणून पहिले शतक केले आहे.

त्यामुळे सलामीवीर रोहित शर्मासाठी 2 ऑक्टोबर हा दिवस खास ठरला आहे.

आजपासून विशाखापट्टणम येथे सुरु झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला योग्य ठरवत भारताचे सलामीवीर रोहित आणि मयंक अगरवालने भारताला चांगली सुरुवात दिली आहे.

या दोघांनीही दुसऱ्या सत्राखेर 59.1 षटकात नाबाद 202 धावांची द्विशतकी भागीदारी केली आहे. रोहित दुसऱ्या सत्राखेर 174 चेंडूत 115 धावांवर नाबाद आहे. त्याने या खेळीत 12 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत. तसेच मयंक 183 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 84 धावांवर नाबाद आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘सलामीवीर’ रोहित शर्माचे द. आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक पूर्ण…

कर्णधार कोहलीने केली गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी, आता केवळ एमएस धोनी आहे पुढे

अर्धशतक करताच हिटमॅन रोहित शर्माचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment