दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये बेंगलोरकडून खेळत असलेल्या एबी डिविलियर्सने बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो केल्याचे वृत्त आहे. त्याने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर आज त्याचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.
एबी डिविलियर्सचे ट्विटर अंकाऊट पाहिले असता सध्या तो २५६ लोकांना फाॅलो करत असुन त्यात विजय मल्ल्या, आयपीएलचे अधिकृत ट्विटर अकांऊट तसेच अायपीएलशी निगडीत अनेकांना फाॅलो करत आहे. मात्र तो बेंगलोरला फाॅलोव करताना दिसत नाही. त्याला ट्विटरवर ६० लाख फाॅलोवर्स आहेत.
तसेच तो इंस्टाग्रामवर १६६ लोकांना फाॅलोव करत असुन त्यात कर्णधार विराट कोहलीचाही समावेश आहे. त्याला इंस्टाग्रामवर ५८ लाखांच्या आसपास फाॅलोवर्स आहे. या माध्यमावरही तो बेंगलोरला फाॅलोव करताना दिसत नाही.
निवृत्त झाल्यावर डिविलियर्सला आजच त्याला त्याचा बेंगलोरचा संघनायक विराट कोहलीने भावनिक ट्विट केला होता.
आज अनफाॅलो नाट्यामुळे यामुळे सोशल मीडियावर मात्र याची चांगलीच चर्चा रंगली आहे. डिविलियर्सने आपण आयपीएलमध्ये खेळत रहाणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे तरीही त्याने एकंदरीत वेगळेच संकेत यातुन दिले असल्याचं बोललं जात आहे. यामुळे त्याच्यात आणि संघव्यवस्थापनात काहीतरी बिनसल्याचे किंवा तो या सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.
एबीने बेंगलोरला ट्विटरवर अनफाॅलो केल्याचे वृत्त येताच चाहत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया-
@ABdeVilliers17 Why would you do that ?? Why did u unfollowed @RCBTweets Everywhere..Don't do this..It's HeartBreaking AB ????
— Sanaaaaa (@Crichipster) May 26, 2018
https://twitter.com/DevvratUnadkat/status/1000407427349647361
Oh My ????@ABdeVilliers17 this will be unbearable.
— Sachi (@Sachi_here) May 26, 2018
https://twitter.com/manjunathpatne/status/1000418859810144258
https://twitter.com/Hramblings/status/1000427283419578369
https://twitter.com/Abhishek_Atwal/status/1000429404114202625