दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स हा आपल्या ३६० डिग्रीत आक्रमक फटके मारण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना डिविलियर्सने असे अनेक षटकार मारले आहेत, ज्यांची कल्पना करणे देखील काही वर्षांपूर्वी अशक्य होते. मात्र, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की डिविलियर्सपूर्वी हे ३ खेळाडू देखील मैदानात आश्चर्यकारक फटके खेळत होते. चला तर बघुयात कोण आहेत ते ३ खेळाडू.
१. सचिन तेंडुलकर
आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकरने अप्पर कट शॉट खेळण्यास सुरुवात केली होती. गोलंदाजाने बाउंसरचा मारा केला असता स्लीपमध्ये उभ्या असलेल्या खेळाडूंच्या डोक्यावरून चेंडू मारण्याची अनोखी शैली सचिनने विकसित केली होती. या अप्पर कट शॉटमुळे सचिनने अनेक धावा बनवल्या. त्याने २००३ विश्वचषकात शोएब अख्तर विरुद्ध मारलेला अप्पर कट आजही प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनात घर करून आहे. पुढील काळात वीरेंद्र सेहवागने देखील अप्पर कट खेळण्यात सुरुवात केली होती.
२. केविन पीटरसन
इंग्लंडचा आक्रमक फलंदाज केविन पीटरसन याने स्विच हिट हा शॉट खेळण्यास पहिल्यांदा सुरुवात केली होती. पीटरसनने क्षेत्ररक्षकांना चकवत स्वीच हिट द्वारे अनेक धावा बनवल्या आहेत. अलीकडील काळात ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने देखील स्विच हिट खेळण्यात निपुणता मिळवली आहे.
३. एमएस धोनी
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा आपल्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे. फलंदाजी असो अथवा यष्टीरक्षण एमएस धोनीची एक वेगळीच शैली आहे. फलंदाज म्हणून धोनीने पहिल्यांदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्यास सुरुवात केली होती. शेवटच्या षटकांत वेगवान गोलंदाज यॉर्करचा वापर करतात व अशा वेळी धावा जमवणे फलंदाजांसाठी अवघड ठरत असे. मात्र, धोनीने यावर पर्याय म्हणून यॉर्कर चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेत षटकार मारण्यास सुरुवात केली. काही वर्षातच धोनीचा हा शॉट क्रिकेट विश्वात फारच प्रसिद्ध झाला.
ट्रेंडिंग लेख-
पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून कोण करणार ओपनिंग?, विराट समोर ‘हे’ ५ पर्याय
नव्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीयांची बल्ले-बल्ले; सहा खेळाडू ‘टॉप टेन’मध्ये
महत्त्वाच्या बातम्या-
‘टी२० क्रिकेटमध्ये गोलंदाज लवकर गुडघे टेकतात,’ ऑस्ट्रेलियन दिग्गज फिरकीपटूचे रोखठोक मत
लंका प्रीमियर लीगमधील अंतिम सामन्याची संपूर्ण माहिती, जाणून घ्या एका क्लिकवर
नववर्षात वेस्ट इंडिज करणार बांगलादेशचा दौरा, ‘या’ कारणामुळे टी२० मालिका रद्द