जागतिक क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही उच्च दर्जाचे संघ आहेत. या दोन्ही संघात जगातील नावाजलेल्या खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे या दोन्ही संघात अतिशय रोमांचक सामने पाहायला मिळतात. मात्र, आव्हान कठीण असूनही काही काही फलंदाज सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करतात.
या लेखात आपण अशा तीन भारतीय फलंदाजांची माहिती घेणार आहोत, ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत सर्वाधिक सरासरी राखत धावा ठोकल्या आहे.
3. अजय जडेजा
माजी भारतीय फलंदाज अजय जडेजा याची खेळण्याची शैली उत्तम होती. तो भारताच्या आघाडीच्या फलंदाजांपैकी एक होता. जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16 वनडे सामने खेळले आहेत आणि यामध्ये त्याने 48.45 च्या सरासरीने 533 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतकांचाही समावेश आहे.
2. विराट कोहली
भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याच्या संपूर्ण वनडे कारकीर्दीत ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध जबरदस्त कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची आकडेवारी पाहिल्यास हे आपल्याला सहज लक्षात येईल. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 40 वनडे सामने खेळले असून 38 डावांमध्ये त्याने 54.57 च्या सरासरीने 1910 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 8 शतके आणि 8 अर्धशतके झळकली आहेत.सध्याच्या घडीला विराट हा क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे.
3. रोहित शर्मा
भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाचा भाग नाही. दुखापतीमुळे रोहितला वन डे आणि टी20 सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितने शानदार कामगिरी केली आहे. त्याने या संघाविरुद्ध वनडे सामन्यात दुहेरी शतकही ठोकले आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 40 वनडे सामन्यांमध्ये 61.33 च्या सरासरीने 2208 धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियन फलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडणारे ३ भारतीय गोलंदाज
वडिलांचं निधन झाल्यावरही देशासाठी मैदानावर लढलेले ३ भारतीय क्रिकेटर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३ दिग्गज कर्णधार, ज्यांच आयपीएल कर्णधारपद मात्र धोक्यात
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! रोहित आणि ईशांत शर्मा पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यातून बाहेर?
टीम इंडियाचे ४ माजी खेळाडू श्रीलंकेतील LPL स्पर्धेत गाजवणार मैदान; ‘या’ संघात समावेश