fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारतीय संघातील या ३ कट्टर मित्रांचा आयपीएलमध्ये युवराज कधीही झाला नाही संघसहकारी

3 Indian Legends Yuvraj Singh has not Played in same time IPL

क्रिकेट जगतात युवराज सिंगला कोण ओळखत नाही असं नाही. त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत खूप काही मिळवलं आहे. त्याच्या सारखा दुसरा कोणी मॅच विनर (सामना विजेता) खेळाडू मिळणं भारतीय संघासाठी अवघड आहे. त्याने 2000 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला सुरूवात केली होती.

या दरम्यान युवराज (Yuvraj Singh) आयपीएलचे (Indian Premier League) 12 हंगामही खेळला आहे. त्यात तो बऱ्याच संघांकडून खेळला. त्यात 2008 ते 2010 पर्यंत किंग्ज इलेव्हन पंजाब, 2011- 2013 पुणे वॉरिअर्स इंडिया, 2014 रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, 2015 दिल्ली कॅपिटल्स, 2016-17 सनरायजर्स हैद्राबाद, 2018 किंग्ज इलेव्हन पंजाब आणि 2019मध्ये मुंबई इंडियन्स या संघांचा समावेश आहे. त्यात त्याने 132 सामन्यांत 2750 धावा केल्या आहेत.

युवराज आपल्या आयपीएल कारकीर्दीत विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, शिखर धवन या खेळाडूंबरोबर खेळला आहे. पण एवढ्या खेळाडूंबरोबर खेळूनही असे काही दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांच्याबरोबर तो खेळू शकला नाही.

एमएस धोनी

भारतीय क्रिकेट संघासाठी खेळताना युवराज आणि एमएस धोनीने (MS Dhoni) बरेच सामने जिंकून दिले आहेत. ही जोडी जेव्हा मैदानात असायची, तेव्हा सर्वांना वाटायचं, की भारताला विजय नक्की मिळणार. पण चाहते इतक्या यशस्वी जोडीला आयपीएलमध्ये कधीही एकाच संघाकडून खेळताना पाहू शकले नाहीत. युवराज 6 संघांसाठी तर धोनी 2 संघांसाठी आयपीएल खेळला आहे.

गौतम गंभीर

कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा चॅम्पियन बनवणारा गौतम गंभीर(Gautam Gambhir) हा दिल्लीसाठीही काही मोसमात खेळला आहे. पण हे दोन भारतीय दिग्गज फलंदाज कधीही एका आयपीएल संघाचे सदस्य राहिले नाहीत. युवराज दिल्ली कडून खेळला तेव्हा गंभीर केकेआरचा सदस्य होता. आता या दोघांनीही निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे चाहत्यांना हे दोन्ही खेळाडू कधीही बरोबर खेळताना पहायला मिळाले नाहीत. गंभीरने आयपीएलमध्ये 154 सामन्यांत 36 अर्धशतकांसह 4217 धावा केल्या आहेत.

विरेंद्र सेहवाग

युवराज आणि विरेंद्र सेहवाग (Virendra Sehvag) 2007 टी20 विश्वचषक आणि 2011 वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते. तसेच हे दोघे दिल्ली आणि पंजाबसाठीही आयपीएल खेळले आहेत. मात्र ते बरोबर खेळू शकले नाहीत. 2018ला युवराज पंजाब संघाचा सदस्य झाला. पण त्यावेळी सेहवाग मात्र संघाचा मार्गदर्शक होता. ही एकच संधी होती दोघांना बरोबर राहण्याची. परंतु त्यातही त्यांना एकत्र खेळता आले नाही.

वाचनीय लेख-

-करियरमधील पहिल्याच वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट्स घेणारे ३ गोलंदाज

-सर्वाधिक वेळा वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारे ५ संघ

-वनडे कर्णधार असताना समोरच्या संघाला जबरदस्त धुणारे ५ क्रिकेटर, ३ आहेत भारतीय

You might also like