आयपीएल हे एक व्यासपीठ आहे जेथे नवीन आणि जुन्या खेळाडूंना खेळण्याची एकत्र खेळण्याची संधी मिळते. येथे खेळाडू स्वत: ला सिद्ध करू शकतात. या स्पर्धेमधून बरेच नवीन खेळाडू मिळाले जे त्यांच्या देशांच्या राष्ट्रीय संघांचे महत्त्वाचे सदस्य झाले. आयपीएल आता युएईमध्ये होणार असून यावर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. आयपीएलसाठी खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये खूप उत्साह आहे.
थरारक असलेल्या या स्पर्धेत चौकार-षटकारांचा जणू पाऊस पडतो आणि प्रेक्षकांचे खूप मनोरंजन होते. गोलंदाजही जर फलंदाजीची संधी मिळाली तर तो चेंडूला सीमारेषा बाहेर पाठवण्यास मागेपुढे पाहत नाही.
ख्रिस गेल, रोहित शर्मा, एबी डिव्हिलियर्स, आंद्रे रसेल, रिषभ पंत सारख्या अनेक दिग्गज खेळाडूंनी षटकार खेचून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आश्चर्य म्हणजे असे काही खेळाडू आहेत ज्यांनी भरपूर धावा केल्यावरही आयपीएलमध्ये कधीही षटकार मारलेला नाही.
क्रिकेटपटू वेगवान फलंदाजी करताना एखाददुसरा चेंडू मिळताच षटकार मारतात, परंतु असे तीन फलंदाज आहेत ज्यांना भरपूर चेंडू खेळण्याची संधी मिळाली, परंतु ते आयपीएलमध्ये एक षटकार ठोकू शकले नाहीत. जलद खेळासाठी या खेळाडूंना आयपीएलच्या लिलावात खरेदी केले जाते आणि त्यांच्याकडून चांगला खेळ दाखविण्याची अपेक्षा असते. बर्याच वेळा अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत.
अशात 3 क्रिकेटपटूंचा या लेखात आढावा घेतला आहे, ज्यांना आयपीएलमध्ये एकही षटकार मारता आला नाही.
आयपीएलमध्ये षटकार मारू न शकलेले फलंदाज-
१. माइकल क्लिंगर (Michael Klinger)
या ऑस्ट्रेलियन खेळाडूला आयपीएल २०११ मध्ये कोची टस्कर्स केरळकडून खेळण्याची संधी मिळाली. त्या हंगामात क्लिंगरला ७७ चेंडू खेळण्याची संधी होती, पण तो चेंडूला एकदाही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकला नाही. इतके चेंडू खेळूनही षटकार न मारल्याने आश्चर्य वाटते.
२. मायकेल क्लार्क (Michael Clarke)
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला २०१२ मध्ये पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्या मोसमात त्याला एकूण ९४ चेंडू खेळण्याची संधी मिळाली पण एकदाही तो षटकार लगावू शकला नाही. खर तर इतके चेंडू खेळल्यानंतरही एकही षटकार न मारल्यामुळे आश्चर्य व्यक्त जाते. क्लार्कला जागतिक क्रिकेटमध्ये एक अनुभवी फलंदाज म्हणून मानले जाते पण आयपीएलमध्ये त्याने कधीही षटकार मारला नाही.
३. कॅलम फर्ग्युसन (Callum Ferguson)
२०११ आणि २०१२ आयपीएलमध्ये या ऑस्ट्रेलियन खेळाडूला पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. या फलंदाजाने आयपीएलच्या इतिहासात एकही षटकार न खेचता सर्वाधिक जास्त चेंडू खेळाला आहे. त्याने ११७ चेंडूंचा सामना केल्यानंतरही आयपीएलमध्ये त्याला एक षटकार देखील मारता आला नाही. जवळपास वीस षटके खेळूनही षटकार न मारणे टी-२० क्रिकेटमध्ये घडणारी दुर्मिळ गोष्ट आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडला बसला मोठा झटका; हा अष्टपैलू खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून पडला बाहेर
विराटच्या नेतृत्वात खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन कर्णधाराची उत्सुकता शिगेला; म्हणतो, भारतीय प्रेक्षकांना…
दुखापतग्रस्त नसूनही वेस्ट इंडिजचा ‘हा’ खेळाडू सीपीएलमधून बाहेर; कारण जाणून दंग व्हाल…
ट्रेंडिंग लेख –
अशी ४ कारणं, ज्यामुळे राजस्थान आहे आयपीएलचा सर्वात प्रबळ दावेदार
एकही आयपीएल आरसीबी जिंकली नाही, पण आरसीबीचे असे ३ विक्रम मात्र मुंबईलाही जमले नाहीत
फिट नाहीत पण हिट आहेत, पोट वाढलेले क्रिकेट जगतातील ३ शिलेदार