क्रिकेटला आज जगभरात मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली जाते. असे म्हटले जाते की, जिथे जिथे ब्रिटिशांचे साम्राज्य होते, तिथे तिथे क्रिकेटचा प्रसार झाला. १६व्या शतकाच्या शेवटी सुरु झालेले क्रिकेट १९व्या शतकापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरुवातीला कसोटी क्रिकेट या प्रकाराचा उदय झाला. त्यानंतर हळूहळू वनडे आणि टी२० अशा क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या प्रकाराचा शोध लागला आणि क्रिकेटची प्रसिद्धी वाढायला सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटव्यतिरिक्त आता क्रिकेटविश्वात विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी अशा मोठमोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. तर, इंडियन प्रीमियर लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग अशा टी२० लीग खेळल्या जातात.
तसं तर, क्रिकेटचे साधारण नियम आपणा सर्वांना माहिती आहेत. अनेकांना क्रिकेटचे काही सामने पाहिल्यानंतरही बऱ्याच नियमांची ओळख होते. परंतु, क्रिकेटमध्ये असेही काही विचित्र नियम आहेत, ज्यांच्याविषयी खूप कमी लोकांना माहिती असेल. या लेखात, आपण क्रिकेटमधील ५ विचित्र नियमांविषयी पाहणार आहोत.
क्रिकेटमधील पाच विचित्र नियम (5 Strange Rules Of Cricket) –
डकवर्थ लुईस मेथड
पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यांमध्ये डकवर्थ लुईस मेथड या नियमाचा वापर केला जातो. आतापर्यंत २००पेक्षा जास्तवेळा या नियमाचा वापर करण्यात आला आहे. १९९९ला इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातही या नियमाचा वापर करण्यात आला होता. या नियमाचा शोध फ्रॅंक डकवर्थ आणि टोनी लुईस यांनी लावला होता.
डकवर्थ आणि लुईस यांच्यामते हा नियम समजून घेणे खूप सोपे आहे. पण अनेकांनी त्यांच्या या वक्तव्याशी असहमती दर्शवली आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार सामना खेळणाऱ्या दोन्ही संघांजवळ दोन साधने असतात, ज्यांचा वापर करत ते जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतात. ही दोन साधने म्हणजे, एकूण उरलेली षटके आणि उर्वरित विकेट्स. सामन्याच्या कोणत्याही वेळेला संघाची धावा करण्याची क्षमता या दोन साधनांवर निर्भर करते.
या गोष्टीचा विचार करत डकवर्थ आणि लुईस यांनी एक सूची तयार केली. ज्यामध्ये सामन्याच्या वेगवेगळ्या पॉंईन्टवर कळून येते की, फलंदाजी करणाऱ्या संघाकडे किती टक्के साधने उपलब्ध आहेत. सामन्यादरम्यान कोणत्याही वेळी या दोन साधनांच्या आधारावर संघाला लक्ष्य ठरवता येते. सामन्यातील उर्वरित षटके आणि उर्वरित विकेट्सचा वापर करत लक्ष्य निर्धारित केले जाते.
नेट रनरेट
नेट रनरेट हा नियम समजून घेणे खूप कठीण आहे. कोणत्याही टूर्नामेंट किंवा लीगमध्ये नेट रनरेट (एनआरआर) हा नियम खूप उपयोगी पडतो. विशेषत: जेव्हा दोन्ही संघ समान सामने जिंकतात आणि त्यांचे गुणही समान असतात, अशावेळी या नियमाचा खूप फायदा होतो.
जर अशी परिस्थिती उद्भवली तर ज्या संघाचा एनआरआर चांगला असेल त्या संघाला पुढे क्वालिफाय केले जाते. एनआरआर काढताना एका संघाच्या पूर्ण रन रेटमधून विरुद्ध संघातील शेवटचा रन रेट वगळण्यात येतो. जर, एखादा संघ सर्वबाद झाला असेल, तर त्या संघातील खेळाडूंनी खेळलेल्या चेंडूंच्या संख्येने त्यांच्या पूर्ण स्कोरला न भागता, त्याऐवजी सामन्यातील पूर्ण षटकांचा वापर केला जातो.
जसे की, वनडे क्रिकेट असेल तर संघाच्या पूर्ण स्कोरला ५०ने भागले जाते, तर टी२० क्रिकेटमध्ये २० ने भागले जाते.
सीमारेषेवरील दोरीसंबंधीचे नियम
कोणत्याही क्रिकेट सामन्यात फलंदाज आणि गोलंदाजांबरोबर क्षेत्ररक्षकांनाही महत्त्वाची भूमिका बजवावी लागते. सीमारेषेजवळ उभा राहून क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना सावध राहून आपले उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करावा लागतो. कधी-कधी क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याच्या प्रयत्नात चुकून सीमारेषेवरील दोरीला स्पर्श करतात. त्यामुळे विरुद्ध संघाला चौकार किंवा षटकार मिळतो. तसेच, कधी कधी क्षेत्ररक्षकांकडून सीमारेषेवरील दोरी जागेवरुन खूप दूरपर्यंत हालवली जाते. तेव्हाही विरुद्ध संघाला चौकार मिळतो.
वाइड बॉलशी संबंधित नियम
वाइड बॉलचा निर्णय करणे खूप अवघड गोष्ट असते. विशेषत: तेव्हा जेव्हा फलंदाज यष्टीच्या बाहेर एक किंवा जास्त पावले ठेवतो. अशा परिस्थितीत जर चेंडू मार्क केलेल्या रेषेच्या बाहेर गेला, तर त्याला वाइट बॉल म्हणणे चुकिचे ठरते.
‘स्विच हिट’ हा एक असा शॉट असतो, जो पंचासोबत इतरांनाही गोंधळात टाकतो. जेव्हा कोणता फलंदाज त्याच्या फलंदाजी शैलीत बदल करतो, तेव्हाही वाइड बॉल ठरवणे अवघड होते. ग्लेन मॅक्सवेल, रिषभ पंत, इयॉन मॉर्गन, डेव्हिड वॉर्नर आणि जोस बटलर असे शॉट खेळताना दिसतात.
ट्रेंडिंग लेख –
मुंबई इंडियन्सच्या ‘या’ ३ खेळाडूंना नाही मिळणार आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळायची संधी
‘या’ ३ बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं सुरेश रैनाचे अफेयर, अनुष्कासोबतही होती चर्चा
आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीप गुणतालिकेत मोठे बदल, भारतापाठोपाठ हा संघ आहे दुसऱ्या क्रमांकावर
महत्त्वाच्या बातम्या –
अबब! आयपीएलला २२२ कोटी रुपयांची स्पाॅन्सरशीप देणारी ड्रीम ११ वर्षाला कमावते एवढे रुपये
पवार साहेबांचे सासरे, ज्यांनी क्रिकेटमध्ये धावांना दाखवला सरासरीचा घाट