माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सर्वकालिक अंतिम अकरा खेळाडूंची निवड केली आहे. त्यांनी या संघाचा कर्णधार महेला जयवर्धनेला बनवले आहे. विशेष म्हणजे किंग्ज इलेव्हन पंजाबच्या या अंतिम अकरा संघात आकाश चोप्रा यांनी ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी आणि इरफान पठाणसारख्या दिग्गज खेळाडूंची निवड केली नाही.
आकाश चोप्रा यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर आयपीएलमधील एक प्रमुख संघ म्हणून, किंग्ज इलेव्हन पंजाबच्या अंतिम अकरा खेळडूंचा संघ निवडला आहे. आयपीएलच्या नियमांनुसार त्यांनी या संघात ४ परदेशी खेळाडू आणि ७ भारतीय खेळाडू निवडले. तर कर्णधार म्हणून त्यांनी विदेशी खेळाडू निवडला.
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या या संघात आकाश चोप्राने ख्रिस गेल आणि केएल राहुलला सलामीवीर म्हणून निवडले. ते म्हणाले, “मी ख्रिस गेलपासून डावाची सुरुवात करीन. त्याला आयपीएलच्या लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते आणि शेवटी किंग्ज इलेव्हन पंजाबने जेव्हा विकत घेतले तेव्हा लोक हसत होते. पण नंतर ख्रिस गेलने दाखवून दिले की तो मोहालीच्या खेळपट्टीवरही धावा करू शकतो. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून पहिल्या सत्रातही त्याने अप्रतिम कामगिरी केली. केएल राहुल आणि त्याची जोडी कदाचित आयपीएलची सर्वात धोकादायक सलामीची जोडी ठरेल.”
राहुल बद्दल चोप्रा म्हणाले, “मी गेलची निवड केली आहे, त्यामुळे आता केएल राहुलचीही निवड करावी लागेल, कारण हे दोघांचे कॉम्बिनेशन उत्तम आहे. जेव्हा आरसीबीने त्याला सोडले तेव्हा मला आश्चर्य वाटले. ते केएल राहुलला टिकवून ठेवू शकले असते परंतु त्यांनी तसं केलं नाही. यानंतर त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून जबरदस्त कामगिरी केली. यावेळी तो संघाचा कर्णधार आहे आणि तो संघाच नशीब बदलेल अशी अपेक्षा आहे. माझा अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात तो यष्टिरक्षकही असेल.”
आकाश चोप्राने शॉन मार्श आणि महेला जयवर्धने यांचीही निवड केली. तर त्यांनी जयवर्धनेला आपल्या संघाचा कर्णधार बनवले आणि म्हटले आयपीएलच्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी तो एक आहे. त्याला आपल्या खेळाडूंची चांगली ओळख आहे. त्याचवेळी आकाश चोप्राने आपल्या संघात डेव्हिड मिलर, युवराज सिंग आणि पियुष चावला यासारख्या खेळाडूंचीही निवड केली.
आकाश चोप्रा यांचा अंतिम अकरा किंग्ज इलेव्हन पंजाब संघ-
ख्रिस गेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), शॉन मार्श, महेला जयवर्धने (कर्णधार), डेव्हिड मिलर, युवराज सिंग, पीयूष चावला, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, प्रवीण कुमार आणि संदीप शर्मा.
ट्रेंडिंग लेख –
कसोटी क्रिकेटमधील सर्वात धीमी खेळी करणारे ५ फलंदाज; एबी डिव्हिलियर्सचाही आहे समावेश
आयपीएलमधील धुव्वांदार फलंदाज व त्यांची आवडती मैदान जिथं ते गोलंदाजांना देत नाहीत सुट्टी
आयपीएलमधील ५ धाकड फलंदाज, ज्यांनी एक नव्हे तर २ वेगवेगळ्या संघांकडून ठोकली आहेत शतकं
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! यावर्षी नाही होणार आयपीएल लिलाव, ही आहेत कारणे
मुलगा स्टुअर्ट ब्रॉडने केली मोठी चूक, वडील ख्रिस ब्रॉडने सुनावली ‘बाप’ शिक्षा
बिली बाऊडेनने आपल्या खास शैलीत बोट उंचावले…आणि वॉर्नचं नाव क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीलं गेलं