मुंबई । आयपीएलमधील खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बोर्डाने एक आराखडा तयार केला आहे. यासाठी बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडची मदत घेण्याची तयारी केली आहे. द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून कार्यरत आहे. द्रविडसह कोरोना विषाणूपासून बचावासाठी बीसीसीआयने एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. द्रविडला टास्क फोर्सचा प्रमुख बनविले आहे.
बंगळुरुमधील एनसीएमध्ये खेळाडूंचे प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी तयार केलेल्या टास्क फोर्समध्ये राहुल द्रविड, एक वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता अधिकारी तसेच बीसीसीआय एजीएम यांचा समावेश असेल. यादरम्यान, यामध्ये टास्क फोर्सच्या खेळाडूंशी नियमित चर्चा करणे आणि आव्हानात्मक असेल तर कोणत्या उपाययोजना केल्या जातात, त्याबद्दल त्यांना माहिती देणे समाविष्ट आहे. एनसीएमधील क्रिकेटपटूंनाही प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी संमतीपत्रावर सही करावी लागेल.
एसओपीनुसार, खेळाडूंना आपापल्या केंद्रांवर प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी संमती फॉर्मवर सही केली पाहिजे. यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आरोग्याविषयी तक्रारी असतील तर त्यांना या प्रशिक्षण शिबिरात भाग घेता येणार नाही.
एसओपीनुसार, प्रशिक्षणाला येण्यापूर्वी एनसीए प्रशासकीय कर्मचार्यांसह सर्व खेळाडू आणि कर्मचार्यांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी सुरू करण्यापूर्वी, कोविड- 19 प्रतिबंध संदर्भात वेळोवेळी देण्यात आलेल्या या एसओपीमधील सर्व प्रोटोकॉल आणि वेळोवेळी देण्यात आलेल्या विविध शासकीय आदेशांचे पालन करण्यासाठी खेळाडूने लेखी संमती दर्शविली पाहिजे.
सहाय्यक कर्मचारी, ज्याचे वय 60 पेक्षा जास्त वयाचे किंवा आजारी आहेत अशा अधिकार्यांना आयपीएल दरम्यान भाग घेण्यास, मैदानावर येण्यास आणि प्रशिक्षण शिबिरात भाग घेण्यास मनाई आहे. स्टेडियमकडे जाण्यापासून ते प्रशिक्षणापर्यंत खेळाडूंनी कडक सुरक्षा प्रोटोकॉल पाळलेच पाहिजेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-हा क्रिकेटर तर चुकून झाला राष्ट्रीय संघाचा कोच, नाहीतर मोहम्मद युसूफच होता लायक
-कोरोनाने घेतले सोलापूरच्या क्रिकेटरचे प्राण, गेल्या २ आठवड्यांपासून चालू होते उपचार
-‘धोनीपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही’ इंग्लंडच्या खेळाडूने केली धोनीची प्रशंसा…
ट्रेंडिंग लेख-
-आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या…
-वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप ५ फलंदाज….
-एकाच वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे ५ भारतीय खेळाडू…