मुंबई। 19 वर्षाखालील विश्वचषकात धमाल कामगिरी करत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शुबमन गिलला, आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या संघात सामील केले. केकेआरसाठी त्याने काही महत्त्वपूर्ण खेळी केल्या आहेत. 2018 मध्ये केकेआरकडून शुबमनने 13 सामन्यांत 203 धावा केल्या. मागील वर्षी त्याने 14 सामन्यांत 296 धावा केल्या.
यंदाच्या आयपीएलमध्ये त्याला वरच्या क्रमांकावर खेळण्याची संधी देण्यात यावी, अशी शिफारस ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू डीन जोन्सने केली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाने सांगितले की, “आता वेळ आली आहे की कोलकाता नाईट रायडर्सने शुबमन गिलला सलामीवीर म्हणून मैदानात उतरावे. केकेआरने शुबमनला आपली फलंदाजीची क्षमता दाखविण्याची संधी दिली पाहिजे. मला शुबमन केकेआरसाठी सलामीला खेळताना बघायचे आहे. मला वाटते की ही शुबमनसाठी एक संधी आहे, त्याला ‘वरच्या फळी’त खेळायला संधी द्यावी.”
ख्रिस लिन आयपीएलच्या या हंगामात केकेआरकडून खेळणार नाही. या संघात, वरच्या फळीची जागा रिक्त आहे. आणि अशावेळी शुबमनला संधी मिळू शकेल. कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यात होणारी आयपीएल स्पर्धा आता 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये होणार आहे. 20 ऑगस्टनंतर सर्व संघ युएईला रवाना होतील.
जोन्सने दिल्लीच्या रिषभ पंतबद्दल सांगितले की, ”पंत या आयपीएलमध्ये कसा खेळतो हे पाहण्यास मी इच्छुक आहे. पंत दबाव कसा हाताळतो हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवणं नाही सोप्पं, नुसते नियम ऐकून तुम्हाला येईल टेन्शन
-झिवाच्या मांडीवरील छोटा मुलगा पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, काहींनी दिल्या धोनीला शुभेच्छा
-विराट कोहली म्हणजे कपडे घातलेला वाघ, संघसहकाऱ्याने केली विराटची थट्टा
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या ५ फलंदाजांमध्ये पहिल्या दोन स्थानावर आहेत परदेशी क्रिकेटर
-आयपीएलमधील सर्वात वयस्कर मोहरे, ज्यांनी वयाला मागे टाकत केले कारनामे
-वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा करणारे अव्वल ३ भारतीय फलंदाज