क्रिडा जगतातून दु:खद बातमी समोर येत आहे. बांगलादेशचा माजी १९ वर्षांखालील खेळाडू मोहम्मद शोजिबचे दुर्गापूर येथे निधन झाले आहे. तो २१ वर्षांचा होता. स्थानिक पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले आहे.
शोजिब उजव्या हाताचा फलंदाज होता. त्याने आपला शेवटचा सामना २०१७- १८ मध्ये ढाका प्रीमियर लीगमध्ये शाईनपुकूर क्रिकेट क्लबकडून खेळला होता.
त्याने बांगलादेशकडून ३ वनडे सामने खेळले होते. तो २०१८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकातील राखीव खेळाडूंमध्ये सामील होता.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक खालिद महमूद यांनी शोजिब हा प्रतिभावान खेळाडू असल्याचे सांगितले. खालिद बांगलादेश ट्रॅक अकादमीचे मुख्य प्रशिक्षक होते. येथे २००८ साली शोजिबने प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती.
महमूद यांनी बांगलादेशातील माध्यमांशी बोलताना सांगितले, “मला विश्वास बसत नाही. मी आज खूप दु:खद बातमी ऐकत आहे. तो एक सलामी फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाजी होता. त्याने शाईनपुकूर क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळले होते.”
राजशाही क्रिकेट क्लबकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या शोजिबचा माजी संघसहकारी तन्मय घोषने म्हटले, “मी नेहमीपासून वाटायचे की तो दीर्घकाळ क्रिकेट खेळेल. तो अकादमीमध्ये खूप मेहनत करायचा. शोजिबबद्दल ऐकून खूप वाईट वाटत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ पठ्ठ्या भारताविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार
‘असे’ ठरणार कसोटी चॅम्पियनशीपमधील अव्वल दोन संघ; भारतासाठी वाट कठीण
“विराट जागतिक क्रिकेटमधील सामर्थ्यवान खेळाडू”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर