नवी दिल्ली। या वर्षाच्या अखेरीस भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया) पर्थऐवजी ऍडलेड किंवा ब्रिस्बेन येथे होण्याची शक्यता आहे. कारण पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या प्रांतीय सरकारने हे स्पष्ट केले आहे की त्यांच्या राज्यात क्वारंटाईन करण्याच्या नियमांमध्ये काहीच तडजोड केली जाणार नाही.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, ऍडलेड ओव्हल मैदान भारत विरुद्ध सलग दोन कसोटी सामने खेळण्याची तयारी करत आहे. यामध्ये दिवस-रात्र कसोटी सामन्याचाही समावेश आहे. याशिवाय व्हिक्टोरियात कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जर मेलबर्न क्रिकेट मैदानात (एमसीजी) बॉक्सिंग डे कसोटी सामना घेणे शक्य झाले नाही तर तो ऍडलेडला खेळला जाऊ शकतो.
यूएईमध्ये आयपीएलमध्ये भाग घेतल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया चे खेळाडू थेट येथे दाखल होतील. युएईमध्ये कोव्हिड-19 मधील घटनांमध्ये वाढ झाली आहे. माध्यमांतील काही वृत्तांनुसार, पश्चिम ऑस्ट्रेलियाचे प्रांतीय सरकारचे पंतप्रधान मार्क मॅकगोव्हन म्हणाले, “परदेशात उच्च जोखिमेच्या भागातून येऊन संघ क्वारंटाईन न होता सामान्य सराव कार्यात भाग घेण्यासाठी येतात. त्यानंतर इतर राज्यांत सामना खेळण्यासाठी जातात हे आम्हाला मान्य नाही.”
सरकारमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया संकटात आहे
क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) च्या सुरुवातीच्या योजनेनुसार इंग्लंड दौर्यावर गेलेला ऑस्ट्रेलियन संघ आणि भारतीय संघ प्रथम पर्थमध्ये दाखल होणार होते. मालिके अगोदर दोन्ही संघांना क्वारंटाईन नियमांत पर्थ येथे सराव करावा लागणार होता. पण हॉटेलमध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी पश्चिम ऑस्ट्रेलिया राज्य सरकारच्या क्वारंटाईनच्या कठोर नियमांमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची योजना गोंधळात पडली.
बीसीसीआयने क्वारंटाइनमध्ये जैव-सुरक्षित वातावरणात सराव करण्यास सीएची परवानगी मागितली आहे, जे पर्थमध्ये शक्य नाही.
दौऱ्याची सुरुवात टी20 मालिकेपासून होईल?
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा टी20 मालिकेपासून सुरू होऊ शकतो आणि त्यानंतर चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही पश्चिम ऑस्ट्रेलिया सरकारच्या क्वारंटाईन आणि सीमा व्यवस्थेबाबतचे कडक नियम स्वीकारतो. ऑस्ट्रेलियन पुरुष संघ ब्रिटनहून परतल्यानंतर पर्थमध्ये यापुढे क्वारंटाईन राहणार नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
-“डीआरएस घेणार नाही, काळजी करू नको,” धोनीचा मजेदार व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल
-गब्बर म्हणतो, आता केवळ ज्युनिअरचं नव्हे तर सिनियर खेळाडूही घेणार ‘या’ खेळाडूकडून धडे
-ब्रॉड म्हणतो, या इंग्लंडच्या क्रिकेटरला वनडेत तोड नाही!
ट्रेंडिंग लेख-
-रोहित-धोनी नव्हे तर ‘हे’ ३ क्रिकेटर्स आयपीएल २०२०मध्ये पटकावतील सर्वाधिक षटकार मारण्याचा अवॉर्ड
-विराटच्या आरसीबीला पराभवाची धूळ चारण्यासाठी हैद्राबादचा वॉर्नर उतरेल ‘या’ ११ शिलेदारांसह
-लिलावात न विकले गेलेले ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर्स म्हणु शकतात ‘मी पुन्हा येईन’!