मुंबई । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तीन हंगामासाठी बेंगळुरूमधील शिक्षण तंत्रज्ञान संस्था ‘अनऐकॅडमी’ ला अधिकृत सहभागीदार बनविण्याची घोषणा केली. आयपीएलचा 13 वा हंगाम (आयपीएल 2020) संयुक्त अरब अमिरातीमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाईल.
आयपीएलचे अध्यक्ष बृजेश पटेल यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “2020 ते 2022 पर्यंत इंडियन प्रीमियर लीगचे अधिकृत सह भागीदार म्हणून अनएकॅडमीची नियुक्ती करण्यात आम्हाला आनंद झाला.” ते म्हणाले, “आयपीएल ही भारतातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे आणि आमचा विश्वास आहे की, एक स्वदेशी भारतीय शिक्षण कंपनी म्हणून अनएकॅडमीचा विशेषत: करिअरसाठी पुढे जाणार्या लाखो भारतीय तरुणांवर याचा चांगला परिणाम होऊ शकतो.”
बीसीसीआयने आयपीएलचे शीर्षक प्रायोजक म्हणून ड्रीम 11ची नियुक्ती केली होती. यापूर्वी चिनी मोबाइल फोन कंपनी व्हिवो ही आयपीएलची मुख्य प्रायोजक कंपनी होती. चीन आणि भारत यांच्यातील वादामुळे या कंपनीने बीसीसीआयशी यावर्षीचा करार रद्द केला.
फ्यूचर ग्रुप आयपीएलपासून वेगळे
फ्यूचर ग्रुपने शेवटच्या क्षणी स्वत: ला आयपीएलपासून वेगळे केले होते. या समूहाने आयपीएल असोसिएट सेंट्रल स्पॉन्सरशिपमधून माघार घेतली आणि त्यानंतर बीसीसीआयने अनएकॅडमीशी हातमिळवणी केली. आयपीएल प्रायोजक म्हणून अनएकेडमीशी बीसीसीआयने तीन वर्षाचा करार केला आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकार्याने सांगितले की,’अनएकॅडमी’ तीन वर्षांसाठी हा करार झाला आहे. फ्यूचर ग्रुपने माघार घेतल्यानंतर आणि ड्रीम 11 चे शीर्षक प्रायोजक अधिकार मिळवले. त्यांनंतर बीसीसीआयकडे आयपीएल 2020 साठी सहयोगी प्रायोजक म्हणून दोन स्लॉट रिक्त होते.
फ्यूचर ग्रुपवर कोरोनाचा प्रभाव
फ्यूचर ग्रुप गेली पाच वर्षे आयपीएलशी संबंधित होता. आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटने देखील अधिकृत प्रायोजक यादीमधून फ्यूचर ग्रुपचा लोगो काढला. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, दरवर्षी हा समूह केंद्रीय प्रायोजकत्वासाठी 28 कोटी रुपये द्यायचा, गेल्या वर्षी आयपीएल दरम्यान फ्यूचर ग्रुप मागे घेण्याची चर्चा होती, परंतु त्यांनी आयपीएल 2019 पूर्ण केला.
महत्त्वाच्या बातम्या-
जिममध्ये डान्स, एफ-१ गेम, पूल अशा गोष्टी करत बायो-बबलमध्ये खेळाडू घेतायेत आनंद, पाहा
चेन्नई सुपर किंग्ससमोरचे विघ्न दूर होईना; आता आणखी एक वाईट बातमी आली समोर
-…म्हणून १७ वर्षे खेळू शकलो, अँडरसनने स्वत: केले हे रहस्य उघड
ट्रेंडिंग लेख-
-सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार
-आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे
-तेराव्या हंगामानंतर ‘या’ २ भारतीय खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमधून नेहमीसाठी सुट्टी, वाचा