---Advertisement---

जिममध्ये डान्स, एफ-१ गेम, पूल अशा गोष्टी करत बायो-बबलमध्ये खेळाडू घेतायेत आनंद, पाहा

On: सोमवार, ऑगस्ट 31, 2020 11:30 AM
---Advertisement---

नवी दिल्ली। साऊथँप्टनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने तयारी सुरू केली आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सध्या जैव- सुरक्षित वातावरणात राहत आहेत. कोणत्याही व्यक्तीसाठी एकाच ठिकाणी दीर्घ काळ राहणे कठीण असते. परंतु खेळाडू इथेही आनंदात राहताना दिसत आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दाखविण्यात आले आहे की, यादरम्यान खेळाडू जिममध्ये डांस करताना आणि फॉर्म्युला-१ सिम्युलेटरवर हाय-ऑक्टेन रेसमध्ये ड्रायव्हिंग करताना दिसत आहेत.

व्हिडिओच्या सुरुवातीला मिशेल मार्श, मार्कस स्टॉयनिस आणि ऍडम झम्पा जिममध्ये डान्स करताना दिसत आहेत. अष्टपैलू स्टॉयनिस या व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, “तुम्ही हॉटेलमधून बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे सर्वजण एकमेकांसोबत मनोरंजन करतात आणि आम्ही केवळ एकमेंकाशी प्रतिस्पर्धा करत आहोत.”

त्याने पुढे सांगितले की, “खेळाडूंना एफ-१ सिम्युलेटर, टेबल टेनिस, पूल मिळाले आहे. याव्यतिरिक्त जिममध्येही व्यायाम करण्यासाठी खेळाडू वेळ घालवत आहेत.”

ऑस्ट्रेलिया संघ ४ सप्टेंबरपासून इंग्लंड विरुद्ध ३ सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये ११ सप्टेंबरपासून ३ सामन्यांची वनडे मालिकाही खेळण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून १७ वर्षे खेळू शकलो, अँडरसनने स्वत: केले हे रहस्य उघड

-इंग्लंडला बसला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू ४ महिने रहाणार क्रिकेटपासून दूर, हे आहे कारण

-सीएसकेचे १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीची प्रतिक्रिया; म्हणतो,

ट्रेंडिंग लेख-

-सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार

-आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे

-तेराव्या हंगामानंतर ‘या’ २ भारतीय खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमधून नेहमीसाठी सुट्टी, वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---