क्रिकेटमध्ये स्पॉट फिक्सिंग होतानाच्या घटना आपण बऱ्याचदा ऐकल्या आहेत. त्यातही जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये हे प्रकरण जरा जास्तच घडताना दिसून येते. संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईत चालू असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामावरही स्पॉट फिक्सिंगचे सावट आहे.
माध्यमातील काही रिपोर्टनुसार, आयपीएल २०२०मध्ये खेळत असलेल्या एका खेळाडूला बाहेरच्या एका अनोळखी व्यक्तीने फिक्सिंग प्रकरणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतू त्या खेळाडूने स्वत: बीसीसीआयच्या अँन्टी करप्शन यूनिटला या गोष्टीची माहिती दिली आहे. अद्याप तरी त्या खेळाडूचे नाव समोर आलेले नाही.
आपणा सर्वांना माहिती आहे की, युएईत कोरोना व्हायरस दरम्यान चालू असलेला आयपीएलचा १३वा हंगाम जैव सुरक्षित वातावरण खेळला जात आहे. त्यामुळे कोणतीही अनोळखी व्यक्ती खेळाडूंशी कोणत्याही गोष्टीसंबंधी संपर्क साधू शकत नाही. परंतु, आता स्पॉट फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करण्याची घटना समोर आल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
बीसीसीआयचे अँन्टी करप्शन यूनिट प्रमुख अजित सिंग यांनी पीटीआयशी बोलताना या गोष्टीची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “आम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत आहोत. पण आम्हाला त्यासाठी थोडा वेळ लागेल. अँन्टी करप्शन प्रोटोकॉलनुसार आम्हाला माहिती देणाऱ्या खेळाडूसंबंधी कसलीही माहिती आम्ही सर्वांना देऊ शकत नाही.”
अँन्टी करप्शन यूनिटचे म्हणणे आहे की, ऑनलाइन माध्यमांद्वारे अनोळखी व्यक्ती खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगसंबंधी संपर्क साधू शकतात. त्या खेळाडूबाबतही असेच काही घडले असावे.
आयपीएल २०२० दरम्यान अँन्टी करप्शन यूनिट सहभागी सर्व खेळाडूंसाठी ऑनलाइन काउंसलिंग सेशन घेत आहे. आयपीएलमध्ये खेळत असलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघातील नव्या खेळाडूंना देखील आधीच या सर्व प्रोटोकॉल्सची पूर्णपणे माहिती देण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
काय योगायोग आहे राव.! बाद होणारा ‘तो’ आणि त्याला झेलबाद करणारे ‘दोघे’ जन्मलेत एकाच वर्षी
विराट बरसला आणि इतिहास रचून गेला, आयपीएलमध्ये ‘हा’ कीर्तिमान करणारा ठरला पहिलाच
कोहलीच्या ‘विराट’ खेळीने राजस्थानची बत्ती गुल, पॉईंट टेबलमध्ये आरसीबी आली ‘या’ स्थानावर
ट्रेंडिंग लेख-
आरसीबीचे ५ महारथी, ज्यांनी आयपीएलच्या हंगामातील पहिल्या ४ डावात कुटल्यात सर्वाधिक धावा
अनुभवी खेळाडूंचा भरणा असणाऱ्या चेन्नईला लोळवणारा १९ वर्षांचा पोरगा, वाचा ‘त्याच्या’ संघर्षाची कहानी
तुम्हाला माहितीये? ‘स्विंग का सुलतान’ असा लौकिक असलेल्या ‘या’ खेळाडूला धोनीनेच दिली होती संधी